महाराष्ट्र

Akola West : संघाच्या बैठकीत अग्रवालसह उमेदवारांचा फैसला 

RSS Meeting : नागपूरमध्ये प्रांत बैठकीकडे अनेकांचे लक्ष

Aseembly Election : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात जात भारतीय जनता पार्टीने अनेक ठिकाणी मनमानी पद्धतीने उमेदवार दिले आहेत. विदर्भात सर्वाधिक विरोध अकोला पश्चिमचे उमेदवार विजय अग्रवाल यांना आहे. पूर्व विदर्भातही अनेक ठिकाणी संघाला नको असलेले उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत. या सर्व उमेदवारांच्या बाबतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत बैठकीत फैसला होणार आहे. नागपूर येथे रविवारी (10 नोव्हेंबर) ही बैठक होत आहे. या बैठकीमध्ये संघ अनेक उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहे. 

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांना भाजपने संधी दिली आहे. त्यांना पाठिंबा द्यावा का, यावर बैठकीत चर्चा होत आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजय अग्रवाल यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रखर विरोध आहे. त्यानंतरही भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. अग्रवाल यांच्या नावाबद्दल संघातील एकही नेता ‘फेवरेबल’ नाही. त्यामुळे केवळ भाजपने उमेदवार दिला म्हणून संघ त्यांच्या पाठीशी उभा राहील असे चित्र अजिबात नाही.

पिंपळे यांना दिलासा 

मूर्तिजापूर मतदारसंघातून आमदार हरीश पिंपळे यांच्यासाठी यांच्यासाठी दिलासादायक बातमी पुढे आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना हिरवा सिग्नल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. अकोट विधानसभा मतदारसंघातही विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांचे भाग्य चमकण्याची चिन्हे आहेत. बाळापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर हे बळीराम सिरस्कार यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. संघही या नावाबद्दल सहमत आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आकाश फुंडकर यांचे ग्रहमान देखील संघाच्या कुंडलीशी मिळते जुळते आहे.

Nitin Gadkari : काँग्रेसने साठ वर्षांत साधे रस्तेही बांधले नाहीत

जळगाव जामोदचे विद्यमान आमदार संजय कुटे यांच्याबाबतही संघामध्ये काहीशी नाराजी आहे. मलकापूरमध्ये चैनसुख संचेती यांचे पारडेही संघाच्या लेखी जड आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून मात्र आमदार संजय गायकवाड यांना खतपाणी घालू नये, असे संघाच्या वरिष्ठांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीतून आऊट झालेल्या भावना गवळी यांचे पुनर्वसन शिवसेनेने केले आहे. त्यांचे डिमोशन करीत त्यांना आमदार करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत न जाण्याबाबतही संघ सहमत आहे. संघाशी आतापर्यंत एकनिष्ठ असलेल्या अनेक नेत्यांच्या पाठीशी स्वयंसेवकांनी राहावं, असा निर्णय झाला आहे. संघाच्या स्वयंसेवकांना कोणाला साथ द्यायची, हे जाहीरपणे सांगण्याची गरज नाही. मतदानापूर्वी त्यांना योग्य तो संदेश मिळणार आहे. त्यामुळे संघाच्या पाठिंबा नसल्याने अनेक उमेदवारांची नाव बुडणार आहे, हे निश्चित.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!