Political News : सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरुन त्यांना धमकी आल्याचे कळते. कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
यापूर्वी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसे यांना धमकी आली होती. 15 आणि 16 एप्रिल रोजी हे फोन आले होते.एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षाचे नेते व्यस्त आहेत. त्यातच रावेर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रक्षा खडसे यांचे सासरे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना धमकीचे फोन आले आहेत.
एकनाथ खडसे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये घर वापसी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांना मिळालेल्या धमकीमुळे या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. रक्षा खडसे यांचा प्रचार करता यावा यासाठी एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा पक्ष प्रवेश हा दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र,अद्याप यासंबंधी अधिकृत तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता एकनाथ खडसे पुन्हा एकदा कधी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार याची उत्सुकता लागली आहे
Lok Sabha Election : उमेदवारी जाहीर होताच कंगना अश्लील फोटोंमुळे चर्चेत
नेमकी काय दिली धमकी
छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे धमकी देणाऱ्याने पहिल्यांदा फोनवरुन सांगितले. त्यानंतर खडसे यांनी तो प्रकार गंभीरतेने घेतला नाही. त्यानंतर दुसऱ्या फोनवरुन पुन्हा फोन आला की तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. तुम्हाला लोक मारणार आहेत. चार ते पाच वेळा असे फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, सदर नंबर ट्रेस केल्यानंतर एक अमेरिका आणि एक उत्तर प्रदेशातील असल्याचे दिसत आहे. याबाबत पोलिस स्टेशला आपण तक्रार दाखल केली आहे, असे खडसे यांनी सांगितले. यापूर्वीही असे धमकीचे फोन आले होते असे ते म्हणाले.