महाराष्ट्र

NCP : घशाच्या इन्फेक्शनमुळे विश्रांती, अजित पवार रिचेबल

Umesh Patil : नाॅट रिचेबल, नाराज मुळीच नाहीत

NCP  : उपमुख्यमंत्री अजित पवार नॉटरिचेबल की असल्याची चर्चा निराधार आहे. निवडणुकीच्या काळात घशाचे इन्फेक्शन झाले असल्याने डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले आहे. मात्र ते उद्यापासून प्रचारात सहभागी होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

काँग्रेसने केलेले आरोप योग्य नाहीत. अजित पवार यांच्यासारखा मासलिडर ज्यांचे महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते आहेत. अशा नेत्याला प्रचारापासून बाजूला ठेवून कोण नुकसान करुन घेईल असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न

राज्यात महायुतीला 15-16 जागा तर महाविकास आघाडीला 30-35 जागा मिळतील अशी भविष्यवाणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. शरद पवार आणि रोहित पवार हेही तसेच बोलत आहेत. राज्यात निवडणूकीचे सर्व टप्पे पूर्ण झालेले नाहीत त्यामुळे अशी भविष्यवाणी करुन पुढच्या मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पवारसाहेबांकडे दीर्घ अनुभव आहे परंतु पृथ्वीराज चव्हाण बोलतात त्यात दम नाही. ज्या विधानसभेत ते नेतृत्व करतात त्यांच्याकडे स्वतःची ग्राम पंचायतदेखील नाही हे केवढे मोठे दुर्दैव आहे अशा शब्दात उमेश पाटील यांनी तोफ डागली.

ते मतदार ठरवतील..

अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही. हे मतदार ठरवतील. 4 जूनला निष्कर्षही येतील. अहो अजित पवार यांच्या पाठीशी 40-50 आमदार आहेत. पण पृथ्वीराज चव्हाण तुमच्यासोबत किती आमदार आहेत असा संतप्त सवाल उमेश पाटील यांनी केला. तुमच्या पाठीशी एकतरी आमदार आहे का, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांना केला.

बॅगावरुन गहजब कशासाठी

अहो, माझी गाडी तपासली तरी गाडीत 3-4 बॅगा सापडतील. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता राज्यात प्रचारासाठी फिरत असताना एवढे साहित्य ठेवतो. तर राज्याचे मुख्यमंत्री दौरा करणार त्यावेळी त्यांचे सामान सोबत असणारच. शिवाय कर्मचाऱ्यांचे सामान असते. त्यात एवढे गहजब करण्याची काय आवश्यकता असा थेट सवाल उमेश पाटील यांनी विरोधकांना केला.

Sudhir Mungantiwar : ती विचारांचं तेल संपलेली मशाल आहे !

हा सुरक्षेचा भाग

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे देशभर सुरू आहेत. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन काटेकोरपणे केलेले असते. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने घाटकोपर दुर्घटनेच्या ठिकाणी परवानगी दिली गेली नाही. यापूर्वी या देशाचे दोन पंतप्रधान सुरक्षेच्या कारणास्तव गमावलेले आहेत. म्हणून सुरक्षा यंत्रणा काळजी घेत असते आणि त्यामुळेच प्रचाराचा कार्यक्रम सोडून तिथे भेट देणे शक्य झाले नाही असे सांगतानाच बेकायदेशीर होर्डिंग संदर्भात कायदा बनवावा अशी मागणी येणाऱ्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस करेल असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!