Another Honor : राजकारण आणि विकासाच्या क्षेत्रात मास्टरी असलेल्या वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आता डॉक्टरकीचीही पदवी आली आहे. वडिल सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्यानंतर आता सुधीर मुनगंटीवार हे देखील सामाजिक, राजकीय आणि विकासाच्या क्षेत्रातील ‘डॉक्टर’ झाले आहेत. गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने मुनगंटीवार यांना डी.लिट. पदवीने गौरविले आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी ही पदवी मुनगंटीवार यांना प्रदान केली. या पदवीमुळे चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेल्याची भावना आता व्यक्त होत आहे.
सुधीर मुनगंटीवार यांची लोकप्रतिनिधी म्हणून आजपर्यंतची कारकीर्द उत्तम आहे. विरोधी पक्षात असो की, सत्तेत मुनगंटीवार हे निरंतर लोकाभिमूख निर्णय घेत असतात. पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण, रुग्णसेवा, विकास आणि सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. मुनगंटीवार यांच्या चौफेर कामगिरीची आजपर्यंत अनेक संस्थांनी दखल घेतली आहे. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानही केला आहे. पुरस्कारांच्या या यादीत आता गोंडवाना विद्यापीठाच्या मानद डॉक्टरेटची (डी. लिट.) भर पडली आहे.
दीक्षांत सोहळ्यात गौरव
गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात नुकताच अकरावा आणि बारावा दीक्षांत सोहळा पार पडला. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी या सोहळ्यात सुधीर मुनगंटीवार यांना ‘मानद डॉक्टरेट’ (डी.लिट.) ही पदवी प्रदान करीत त्यांचा सन्मान केला. गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाच्या उभारणीत मुनगंटीवार यांचा मोलाचा वाटा आहे. या विद्यापीठाला वन व आदिवासी विद्यापीठाचा (Forest & Tribal University) दर्जा मिळण्याबाबत जी प्रक्रिया झाली, ती देखील मुनगंटीवार यांच्यामुळेच. त्यामुळे मानद डॉक्टरेट पदवीच्या माध्यमातून मुनगंटीवार यांनी दिलेल्या योगदानाप्रती विद्यापीठाने कृतज्ञता व्यक्त केली, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
शिक्षण क्षेत्रासाठीही मुनगंटीवार यांचे योगदान अमूल्य असेच आहे. संसदीय आयुधांचा वापर करीत त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा (RTMNU) नामविस्तार केला. अमरावतीच्या विद्यापीठालाही संत गाडगे बाबा यांचे नाम मिळाले, ते देखील मुनगंटीवार यांनी दिलेल्या योगदानामुळेच. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे विद्यापीठाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे, यासाठी पाठपुरावा केला तो मुनगंटीवार यांनीच. याशिवाय वीर बाबुराव शेडमाके, संत जगनाडे महाराज, महाराष्ट्रभूषण बाबा आमटे यांच्या स्मरणार्थ डाक तिकीट प्रकाशित होण्यासाठी मुनगंटीवार यांनी केलेला पाठपुरावा सर्वश्रुत आहे.
गौरवास्पदच प्रवार
सुधीर मुनगंटीवार 1999 मध्ये प्रथम आमदार झालेत. आमदारकीच्या पहिल्याच ‘टर्म’मध्ये त्यांना ‘उत्कृष्ट आमदार’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर व तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते या पुरस्काराने मुनगंटीवार यांना प्रदान करण्यात आला होता. पहिल्याच टर्ममध्ये असा पुरस्कार क्वचितच मिळतो. दृष्टिहीन व्यक्तींसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल मुनगंटीवार यांना नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडतर्फे ‘जी.एल. नरडेकर मेमोरियल’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर दी सीएसआर जरनलच्यावतीने ‘गुड गव्हर्नन्स’ पुरस्कारही त्यांना मिळाला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. लोकमतनेही त्यांना ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित केले.
Sudhir Mungantiwar : पुन्हा सरकार आल्यास पोंभूर्णात उद्योग अन् समृद्धी
नाशिकच्या दीडशे वर्षे जुन्या वाचनालय समितीकडून ‘अष्टपैलू राजकारणी’ म्हणून मुनगंटीवार यांचा सन्मान करण्यात आला. चार लिम्का रेकॉर्ड, लक्षावधी दिव्यांनी ‘सियावर रामचंद्र की जय’ ही अक्षरं साकारल्याबद्दल तसेच ‘ग्रीन भारतमाता’ साकारल्याबद्दल दोन ‘गिनेस बुक ऑफ द रेकॉर्ड’ही मुनगंटीवार यांच्या नावावर आहेत. विक्रमी वृक्ष लागवड केल्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) यांच्याकडून ‘मन की बात’मध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा विशेष उल्लेख पंतप्रधानांकडून करण्यात आला होता. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला देशामधील पहिला आयएसओ दर्जा मिळाला आहे.
सरप्लस बजेट
महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून मुनगंटीवार यांनी आपली कारकीर्द गाजविली. महाराष्ट्राला पहिले ‘सरप्लस बजेट’ देणारे ते वित्तमंत्री ठरले. एवढेच नव्हे तर देशात प्रथमच असे ‘सरप्लस बजेट’ देणारे ते पहिले वित्तमंत्री ठरले. आजपर्यंत देशातील कोणत्याही राज्यात कोणत्याही वित्तमंत्र्याने ‘सरप्लस बजेट’ दिल्याची नोंद नाही. त्यामुळे वित्तमंत्री म्हणून केलेल्या उल्लेखनिय कार्यासाठी मुनगंटीवार यांना आज तक व इंडिया टुडेकडून ‘बेस्ट फायनान्स मिनिस्टर इन इंडिया’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिवंगत नेते अरुण जेटली यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. स्वातंत्र्यानंतर 11 हजार 975 कोटी महसुली आधिक्य असणारा अर्थसंकल्प त्यांनी दिला होता.