महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar: मूल येथील पॉलिटेक्निक कॉलेजसाठी सरसावले मुनगंटीवार

Polytechnic College : उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

Mahayuti 2.0 : मूल तालुक्यात खाणकाम व्यवसायावर आधारित उद्योग व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी मूल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात बुधवारी (ता. 27) मुंबई येथे मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण सहसचिव संतोष खोरगडे यांच्यासोबत बैठक घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच उच्च व तंत्रशिक्षण प्रधान सचिव यांच्याशी मुनगंटीवार यांनी फोनवर सकारात्मक चर्चा केली. चंद्रपूर जिल्हात ठिकठिकाणी खाणीचे उत्खनन सुरू आहे. या जिल्ह्याला औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख प्राप्त आहे. मूल तालुक्यामध्ये खाणकाम व्यवसाय व त्यावर आधारित उद्योग सुरू होत आहेत. त्यामुळे या उद्योगांना कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली आहे.

शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे

मूल या ठिकाणी उच्च तांत्रिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे उद्योगांना स्थानिक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. उच्च व तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातील युवकांना इतर शहरांमध्ये जावे लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी गैरसोय होत आहे. परिणामी स्थानिक विकासावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उद्योगासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. स्थानिक युवकांना तांत्रिक शिक्षण मिळून रोजगार उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने मूल येथे एक शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना केली आहे.

Sudhir Mungantiwar : ‘सीएम’ अर्थात ‘कॉमन मॅन’ची सेवा महत्त्वाची

यासंदर्भात मुनगंटीवार यांच्यासोबत फोनवर झालेल्या चर्चेला चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच मूल येथील पॉलिटेक्निक कॉलेजचा मार्ग मोकळा होणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देशातील सर्वोत्तम अशी सैनिकी शाळा झाली आहे. वन अकादमी आणि बांबू केंद्र ही त्यांच्याच प्रयत्नांचे फलित आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्रही होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवतींना मोठ्या प्रमाणावर उच्च शिक्षण मिळणार आहे. त्यानंतर आता सुधीर मुनगंटीवार आहे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासाठी पाठपुरावा करीत आहेत. मूलमध्ये हे तंत्रनिकेतन महाविद्यालय झाल्यास या भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!