महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : हरीयाणात यश मिळाले; जम्मू काश्मिरातही भाजपची ताकद वाढली

Assembly Election : सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

हरीयाणामध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. जम्मू काश्मिरातही भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे. महाराष्ट्रातील लोकांना विकास हवा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीला निश्चित यश मिळेल, असा विश्वास राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. राज्याच्या विकासासंदर्भात असलेले ‘व्हिजन’ त्यांनी यावेळी मांडले. राज्यातील अनेक महत्वाच्या विषयांवरही त्यांनी यावेळी भाष्य केले.

मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं. हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकलंही होतं. परंतु मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं. त्यानंतर आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टात हे आरक्षण त्यावेळच्या सरकारला टिकवता आलं नाही.

हे महाराष्ट्राचं आणि तमाम मराठा समाजाचं दुर्दैव आहे. आताही मराठा समाजाला आरक्षण देण्याचे प्रयत्न झाले. पण काही लोकांनी केवळ केंद्र सरकारकडं बोट दाखविणं सुरू केलं. आरक्षणात कसं येता येईल यावर एकत्र येऊन बोलण्यापेक्षा केवळ विरोध सुरू केला, असं मुनगंटीवार म्हणाले.

बहिणींचं ओझं कसलं ?

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेमुळं सरकारच्या तिजोरीवर कुठेही भार पडलेला नाही. आपण स्वत: महाराष्ट्राचे अर्थमंत्री होतो. स्वातंत्र्यानंतर पहिलं सरप्लस बजेट आपण राज्याला दिलं. त्यामुळे सगळं अर्थकारण आपल्याला ठाऊक आहे.

लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत आहे. तिजोरीवर भार पडला असता, तर कुठे तर त्याचा उल्लेख झाला असता. सरकार कोणतीही योजना लागू करते, त्यावेळी त्यामागील अर्थकारण पहिले तयार करते. त्यासंदर्भातील आर्थिक तरतूद आधी तयार करते. त्यानंतरच योजनेची अंमलबजावणी सुरू होते. मनात येईल तेव्हा ऐनवेळी कोणतीही योजना सुरू करता येत नाही, असं मुनगंटीवार यांनी अत्यंत जबाबदारीनं नमूद केलं.

Sudhir Mungantiwar : शेतीचा व्यवसाय मजबुरीचा नाही, तर मजबुतीचा होणार !

सरकारनं राज्यातील बहिणींना लाडकी असं म्हटलं आहे. त्यामुळं बहिणीला देताना कोणतंही ओझं होऊच शकत नाही असं मुनगंटीवार म्हणाले. मात्र लोकसभा निवडणुकीप्रमाणे आताही विरोधक मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधक धादांत खोटं बोलले. त्यामुळे काही खासदार चुकीच्या पद्धतीने संसदेत गेले. आता ते काहीच काम करेनासे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे. त्या त्या मतदारसंघाचं नुकसान झालं आहे. हरीयाणा आणि जम्मू काश्मिरातील मतदारांनी जसा भरभरून कौल दिला, तसंच आता महाराष्ट्रात होणं गरजेचं आहे. अन्यथा महाराष्ट्र काळोखात लोटला जाईल, अशी चिंताही सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!