महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या कामांचे विरोधी पक्षनेत्यांनाही आकर्षण !

Vijay Wadettiwar : मूल एमआयडीसीमध्ये सुरू करणार इथेनॉल प्रकल्प

Maharashtra Assembly Elections : हल्लीचे राजकारण पूर्वीसारखे राहिले नाही. ‘बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर’, अशी भूमिका मतदार घेतात. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मतदार आणि एकूणच चंद्रपूर जिल्ह्याचा विषय असेल तर जनता आता आपल्या भूमिकेबद्दल आग्रही झालेली दिसते. अशा परिस्थितीत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी केलेल्या कामांचा ठसा जिल्ह्यात, राज्यातच नव्हे तर देशभर उमटला आहे.

काँग्रेस नेते आणि राज्याच्या विधानसभतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कामांनी भुरळ घातली आहे. एके काळी मूल एमआयडीसी परिसरात कुणी पानपट्टी लावायलाही धजावत नव्हतं आणि आज तेथेच पानपट्टी लावायलाही जागा नाही. येवढा विकास मूल एमआयडीसी परिसराचा मुनगंटीवार यांनी केला. मूल एमआयडीसीमध्येच विजय वडेट्टीवार आता इथेनॉल प्रकल्प उभारणार आहेत. म्हटले जाते की, सुधीर मुनगंटीवार यांच्या कामांची प्रशंसा त्यांचे विरोधकही खासगीत करतात. याची प्रचिती या निमित्ताने चंद्रपूर जिल्हावासीयांना आली आहे.

विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही भागांमध्ये एमआयडीसी नाही. परिणामी रोजगार नाहीत. त्यामुळे येथील बेरोजगार इतर भागांत जाऊन रोजगार शोधण्याच्या प्रयत्नांत असतात. त्यातच आता मूल येथे इथेनॉल प्रकल्प थाटल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील लोकांनाही जिल्ह्यातल्या जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळेच की काय विजय वडेट्टीवार यांनी मूल एमआयडीसीमध्ये इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे बोलले जात आहे.

Assembly Election : निवडणुकीत मुनगंटीवारांनी जपली अनोखी परंपरा !

काहीही का असेना वडेट्टीवार यांच्या पुढाकारामुळे मूल तालुक्याचा औद्योगिक विकास साधण्यास वाव मिळाला आहे. याचा फायदा केवळ मूल तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला होणार आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आले पाहिजे. मग भलेही ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील का असेना, अशी अपेक्षा जिल्ह्यातील नागरिक व्यक्त करत आहेत आणि त्यांची ही अपेक्षा गैर नाही. शेवटी काय लोकांची कामे झाली पाहिजे आणि हीच भूमिका लोकप्रतिनिधींची असली पाहिजे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!