महाराष्ट्र

Pravin Darekar : विरोधकांची मानसिकता विकृत

Shivaji Maharaj Statue : भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांची टीका

BJP Vs Mahavikas Aghadi : एकीकडे भारत जोडोचे आंदोलन उभे करायचे. दुसरीकडे दुर्घटनेचा फायदा घेऊन विकृत मानसिकता दाखवायची. जोडो मारो आंदोलन करायचे. अशा कृतीतून विरोधी पक्ष बिथरला आहे, हे सिद्ध होते, अशी टीका भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात झालेल्या घटनेचे समर्थन कुणी करणार नाही. त्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. चौकशी सुरू आहे. दोषी असतील त्यांच्यावर कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिले आहे. परंतु विरोधी पक्ष या घटनेचे दुर्दैवी राजकारण करत आहे, असे दरेकर म्हणाले.

बदलापुरातील घटना अत्यंत निंदनीय होती. परंतु त्याचा राजकीय वापर करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फलक झळकाविण्यात आले. सरकारची प्रतिमा मलीन करण्याचे कारस्थान करण्यात आले. अगदी तसाच प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात सुरू आहे. पुतळ्याचे राजकारण करून शिवप्रेमी सरकारच्या विरोधात जावे अशी भूमिका विरोधकांची आहे. महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्ष राज्यात होते. त्या काळात उद्धव ठाकरे यांनी छत्रपतींच्या गडकिल्ल्यासाठी, स्मारकासाठी काय केले, हे पाहिले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या आणि या दोन वर्षाच्या एकनाथ शिंदेंच्या काळात गडकिल्ल्याची काळजी सरकार घेत आहे. रायगड, प्रतापगडचे प्राधिकरण झाले, असेही दरेकर म्हणाले.

ठाकरेंचा समाचार

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबतदरेकर म्हणाले की, टेंडरचा उद्धव ठाकरेंना नीट अभ्यास आहे. 25 वर्ष मुंबई महापालिकेची सत्ता त्यांच्याकडे आहे. त्यामुळे टेंडरचा विषय त्यांनी जवळून हाताळलेला आहे. त्यांचे दुखणे टेंडरचे आहे की, पुतळ्याचे, हे त्यांनी स्पष्ट करावे. मुंबई महापालिकेचा विकास गतीने होत असताना त्यांचा जीव टेंडरमध्येच अडकला आहे. टेंडरवरच ठाकरे जास्त बोलतात. टेंडरवाले त्यांच्याकडे जात नाहीत. त्याची झळ त्यांच्या मनात निश्चित असू शकते. छत्रपतींच्या बाबतीत टेंडर हा विषय असूच शकत नाही. टेंडर अयोग्य, चुकीच्या माणसाकडे असेल तर विरोधी पक्षच काय आमचीही मागणी असेल संबंधितावर कारवाई झाली पाहिजे.

Assembly Elections : राजुरा विधानसभा कोणाकडे जाणार? 

उद्धव ठाकरे यांना अनुभवाच्या बाबतीत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांना मुख्यमंत्रिपदाचा कोणता अनुभव होता. त्यानंतरही ते मुख्यमंत्री पदावर बसले. अनुभव नसल्यावर कसे वाटोळे होते, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र अधोगतीकडे गेला. आदित्य ठाकरे यांना प्रचंड अनुभव होता का? ठाकरेंकडे अनेक अनुभवी आमदार होते. पण त्यांनी त्यांना मंत्री केले नाही. आपल्या मुलाला मंत्री केले. अनुभव नसताना मुलासाठी ठाकरे वाकले. स्वत:ला किंवा मुलाला कोणतही अनुभव नसताना महाराष्ट्राचे त्यांनी वाटोळे केले. तसे अनुभवी माणसामुळे झाले असेल, तर कारवाई होईल. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, असेही दरेकर म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!