Amit Shah Tour : नाशिक येथे दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ताफ्याला मार्ग बदलावा लागला. पावसाच्या पाण्यामुळे ताफ्यातील मार्गात बदल झाला. यावरून काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एक व्हिडीओ शेअर करत महायुती सरकारवर टीका केली. नाशिक येथे जात असताना शाह यांच्या ताफ्याने रस्त्यावर पाणी साचल्याचे पाहून मार्ग बदलला. त्यानंतर लोंढे यांनी यावरून गडकरी आणि शिंदे यांना लक्ष्य केले.
व्हिडीओ शेअर करीत लोंढे म्हणाले, अमित शाह यांना नितीन गडकरी आणि एकनाथ शिंदे यांच्या विकासावर विश्वास नाही का? शाह यांचा ताफा रस्त्याच्या कडेने निघून गेला. रस्त्याच्या मधून गेले असते तर त्यांना कदाचित विकास दिसला असता. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका करताच सोशल मीडियावरही अनेकांनी एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारला जाब विचारला काही जणांनी एक्सवर पोस्ट करत शिंदे यांना परखड प्रश्न विचारले. मुसळधार पावसामुळे मुंबईसह अनेक भागात पाणी साचले. रेल्वे सेवा विस्कळीत झाली. लोकांना स्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
नागपुरातही पूर
उपराजधानी नागपुरातील मुसळधार पाऊस झाला की पाणी साचते. यावरून गेल्या अनेक वर्षांपासून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. नागपूर देशातील देशातील तेराव्या क्रमांकांचे शहर आहे. रात्यात नागपूरचा क्रमांक मुंबई, पुण्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर म्हणून लागतो. 218 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात नागपूर पसरले आहे. वर्षाकाठी येथे 1 हजार 200 मिलिमीटर पाऊस पडतो. नागपुरात कोणतीही महाकाय नदी किंवा समुद्र नाही. तरीही येथे पूर येतो. अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा हे तीन मोठे तलाव नागपुरात आहेत. शहरातून नाग नदी प्रवाही आहे. शहरातील नाग नदीची लांबी 17 किलोमीटर आहे. नागपुरात येणाऱ्या पुराचे खापर आता नाग नदी आणि अंबाझरी तलावावर फोडले जाते. परंतु अनेक भागात ड्रेनेजच नसल्याने पाणी साचत असल्याचे दिसते.
Vanchit Bahujan Aghadi : पहिल्या यादीनंतर वंचितची निवडणूक समन्वय समिती!
नागपुरात 740 नाले आहेत. या नाल्यांना 58 संरक्षक भींती आहेत. परंतु सांडपाणी वाहून जाण्यासाठी अनेक भागात नियोजन नाही. त्यामुळे पावसाचे पाणी जमा झाले की ते वाट फुटेल तिकडे वाहते. उंच रस्त्यांमुळे आजूबाजूची लाखो घरे खोलगट भागात गेली आहेत. पाणी वाहून जाण्यासाठी वाहिन्या बांधल्या, पण त्या एकमेकांना जोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे साचणाऱ्या पाण्याचा निचरा कसा होणार, असा प्रश्न आहे. परिणामी हलका पाऊस आला, तरी नागपुरात पुरासारखी परिस्थिती तयार होते. रस्ते बंद होतात. आता यावर तोडगा काढण्यात येत आहे. परंतु अमित शाह यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने नागपुरात साचणाऱ्या पावसाच्या पाण्यावरही उपाय गरजेचे झाले आहेत.