महाराष्ट्र

Congress : विधानसभा निवडणूक आघाडी एकत्र

Assembly Election : महायुती सरकारला उखडून फेकण्याचा के. सी. वेणुगोपाल यांना विश्वास

War To Win Maharashtra : काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये राहून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढणार आहे. काँग्रेस विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाणार आहे. यासंदर्भातील रणनीती शुक्रवारी (ता. 19) मुंबईत झालेल्या बैठकीत ठरविण्यात आली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशभर जनाधार मिहाला. पोटनिवडणुकीतही भाजपाचा सुपडा साफ झाला. जनतेला महाराष्ट्रातही परिवर्तन हवे आहे. महाविकास आघाडी विधानसभेची निवडणूक एकत्र लढेल. तीनही पक्ष एकत्रित बसून जागावाटपाची चर्चा करतील. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला सत्तेतून उखडून फेकू, असा निर्धार केल्याची माहितर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.

मुंबईतील गरवारे क्लब येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक शुक्रवारी पार पडली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (Nana Patole) अध्यक्षस्थानी होत. बैठकीला काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, सरचिटणीस प्रमोद मोरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

जनतेचा बदल हवाय

वेणुगोपाल म्हणाले, राज्यातील जनतेला परिवर्तन हवे आहे. महाभ्रष्ट सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हा काँग्रेस पक्षाचा संकल्प आहे. भारतीय जनता पक्षाने सरकारी यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला. तरीही त्यांचा पराभव झाला. भाजपाचा अयोध्येनंतर बद्रिनाथमध्येही जनतेने पराभव केला आहे. महाराष्ट्रातील जनताही असंवैधानिक सरकारला सत्तेवरून खाली खेचून परिवर्तन करणार आहे. विधान परिषद निवडणुकीत (MLC Election) पक्षाच्या ज्या आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केले त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. काही दिवसांत त्याची माहिती मिळेल. पक्षात काँग्रेसमध्ये बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही.

बैठकीत विधानसभा निवडणूक तयारीसंदर्भात चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्ष संविधान, लोकशाही व महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणाची लढाई लढणार आहे. आम्ही महाराष्ट्राला गुजरातचा गुलाम होऊ देणार नाही. महाराष्ट्राची संपत्ती आणि मुंबई गुजरातला विकू देणार नाही. 20 ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती आहे. काँग्रेस ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करेल. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लीकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे कार्यक्रमाला उपस्थित राहतील. असून याच दिवशी विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढणे, हाच काँग्रेसचा हेतू असेल, असे नाना पटोले म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!