अभिजीत घोरमारे
Congress : सांगलीत काँग्रेसच्या स्नेह भोजनाला बंडखोर विशाल पाटील, विश्वजित कदम यांनी सुध्दा हजेरी लावली. यावर भंडारा येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात आपसी संबंध असतात. विशाल पाटील, विश्वजित कदम हे भाऊ बंधकीतील आहेत. त्यामुळे ते या स्नेभोजनाला आले असतील. तसेही सांगलीत काँग्रेसचा पंजा नव्हता असा घुमजाव पटोले यांनी केलेला दिसला. त्यामुळे काँग्रेसचा छुपा पाठिंबा विशाल पाटलांना होता काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पटोले यांनी प्रसार माध्यमांची बोलताना सरकारवर ताशेरे ओढले. उच्च न्यायालयाने मुस्लिमांचे ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. 2010 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने मुस्लिम जातींना ओबीसी प्रवर्गात दर्जा दिला होता. मात्र, आता कोलकाता उच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास आरक्षणाचा तिढा सुटेल.
महाविकास आघाडीत आलबेल…
सांगलीतील काँग्रेसच्या स्नेह भोजन कार्यक्रमाला बंडखोर विशाल पाटील, विश्वजित कदम हे आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी म्हटले की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सांगलीतील सर्व विधानसभा जागा पाडू. यावर नाना पटोले म्हणाले, हे सर्व जनतेच्या हातात असते नेत्यांच्या नाही. त्यामुळे जनता ठरवेल.
पाणीटंचाई..
सांगलीत पाणी टंचाई आहे त्यावर बोलायला पाहिजे. असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. तसेच महाविकास आघाडीत आलबेल असल्याचे भासवले जात आहे. स्थानिकात तशी भावना आहे का, ही बाब वेगळी. मात्र राजकीय पातळीवर तसे भासवले जात आहे.