महाराष्ट्र

Bhandara Constituency : साकोलीतून काँग्रेसचा उमेदवार निश्चित

Congress Party : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दाखल यांचा उमेदवारीसाठी अर्ज

Nana Patole : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशात काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा असलेल्या भंडारा जिल्ह्यातून उमेदवाराचे नाव निश्चित झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे साकोली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात असे सांगण्यात येत आहे. राज्यातील उर्वरित मतदारसंघांसाठी लवकरच उमेदवारांची नावे निश्चित करण्यात येणार आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यात अनेक मतदारसंघातील उमेदवारांची नावे ठरण्याची दाट शक्यता आहे.

सद्य:स्थितीत काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. काँग्रेसच्यावतीने सर्व विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांची नावे मागविण्यात आली आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी देखील यात आपले नाव दिले आहे. पटोले यांनी निवडणूक लढविण्यास इच्छूक असल्याचे नमूद केले आहे. साकोली विधानसभा मतदारसंघातून पटोले यांनी पुन्हा एकदा काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. पटोले यांच्या नेतृत्वातच काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली. त्यामुळे काँग्रेस हायकमांड त्यांना साकोलीसाठी नकार देणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

विरोधकांना धोबीपछाड

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या तुलनेत काँग्रेसचा स्ट्राइक रेट जोरदार होता. महाराष्ट्रात काँग्रेसच्या या यशामुळे दिल्लीत आमदार नाना पटोले यांच्या प्रतिष्ठेत वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पक्षांतर्गत विरोधकांनाही पटोले यांनी धोबीपछाड दिली आहे. निवडणुकीच्या आधी नाना पटोले यांच्यावर काँग्रेस पक्षातीलच अनेक नेत्यांनी आरोप केले होते. काँग्रेसमधून अनेक नेते मध्यंतरीच्या काळात पक्षातून बाहेर पडले. काँग्रेसमधील या फुटीसाठी अनेकांनी नाना पटोले यांना जबाबदार ठरविले. मात्र लोकसभेतील विजयामुळे आता पटोले विरोधकांना चांगलीच चपराक बसली आहे. अशातच लोकसभा निवडणूक पटोले यांच्या नेतृत्वात लढण्याचा निर्णय झाला.

AAP : दीड वर्षांनंतर सिसोदिया येतील तुरुंगाबाहेर!

 विधानसभा निवडणुकीकडे लक्ष

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभा निवडणूक देखील पटोले यांच्याच नेतृत्वातच लढल्या जाणार असल्याचे निश्चित आहे. पटोले हे देखील विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यांनी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीकडे आपला अर्ज सादर केला आहे. उमेदवारी अर्जासोबत आमदार नाना पटोले यांनी पक्षाच्या आदेशाप्रमाणे 20 हजार रुपयांचा डीडी देखील सादर केला आहे. डारा विधानससभेसाठी 11 तर तुमसर विधानसभेसाठी 6 अशा एकूण तीन विधानसभेसाठी 18 उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!