महाराष्ट्र

Nana Patole : ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’, हा मंत्र मोदींच्या लोकांसाठी नाही

Mahayuti 2.0 : नाना पटोले यांचा अजित पवार यांच्या अप्रत्यक्षपणे प्रहार

‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’, अशी घोषणा देत नरेंद्र मोदी सत्तेत आले होते. पण हा मंत्र मोदींच्या लोकांसाठी नाही, तर इतर लोकांसाठी आहे. या देशात कष्ट करणाऱ्या लोकांच्या घामाचा पैसा जीएसटीच्या माध्यमातून त्यांच्या मुठभर मित्रांना वाटला जातो आहे. भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन त्यांची भ्रष्ट्राचाराची प्रकरणे दाबण्याचे काम मोदी सरकार करत आहे, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रहार केला.

विधानसभा निवडणूक 2024मध्ये निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी आज (7 डिसेंबर) मुंबईत होतो आहे. शपथविधीला रवाना होण्यापूर्वी नाना पटोले नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार यांची जी संपत्ती जप्त झाली होती, ती दिल्ली ट्रीब्यूनलकडून सोडवण्यात आली आहे, याबाबत विचारले असता नाना पटोले यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. देशभरात आज काय सुरू आहे, हे लोकांना कळत आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

मरकटवाडीला शरद पवार आणि राहुल गांधी जाणार आहेत, अशी चर्चा आहे. याबाबत विचारले असता, मरकटवाडीसाठी अजून प्रोग्राम आलेला नाही. पण त्या अनुषंगाने नियोजन सुरू आहे. मताचा अधिकार वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. मरककटवाडीतून त्याची ठिणगी पेटली आहे. ती देशभरात पोहोचवण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाने घेतला आहे. राहुल गांधी यांच्याशी माझं याबाबत बोलणं झालं आहे. लवकरच मरकटवाडीबाबतचे नियोजन होईल, असे पटोलेंनी सांगितले. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास दिल्लीत सुरू आहे, बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी काम सुरू आहे, असंही ते म्हणाले.

Winter Session : विशेष अधिवेशन फक्त शपथविधीसाठी !

आजच्या शपथविधीबाबत पटोले म्हणाले, सर्व आमदारांना विधानसभेची शपथ घ्यावी लागते. ही एक प्रक्रिया आहे. सरकार स्थापन करण्यासाठी 13 दिवस लागले. या सरकारमध्ये फार आलबेल आहे, असं काही दिसत नाही. महाराष्ट्रात 27 महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. मागच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की, 24 तासांत आरक्षण आणू. पण त्याचे पुढे काय झाले कुणालाच माहिती नाही. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषदा आदी निवडणुकांबाबत काय खरं, काय खोटं, हे येत्या काळातच कळेल, असंही नाना पटोले यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!