महाराष्ट्र

Atul Londhe : उड्डाणपूल भूमिपूजन भाजपचा की सरकारचा कार्यक्रम

Congress : जाहिरात प्रकाशित झाल्याने अतुल लोंढे यांचा सवाल

Nagpur Fly Over : नागपुरातील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने यासंदर्भात जाहिरातबाजी केल्याने काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उड्डाणपुलाचा कार्यक्रम सरकारी आहे की भाजपचा असा सवाल उपस्थित केला आहे. भारतीय जनता पार्टी लोकशाही, संविधान मानत नाही हे वारंवार उघड झाले आहे. त्याविरोधात काँग्रेस एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून नेहमीच आवाज उठवत आला आहे. भाजपाच्या या तानाशाही वृत्तीचा नागपुरातही प्रत्यय आला. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे नेते, मंत्र्यांच्या उपस्थितीत भूमीपूजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे काँग्रेसच्या आमदारांना निमंत्रित करण्यात आले नाही. हा कार्यक्रम भाजपा होता की सरकारचा, असा प्रश्नीर लोंढे यांनी विचारला आहे.

अतुल लोंढे म्हणाले की, नागपुरातील म्हाळगीनगर व मानेवाडा वळण रस्त्याच्या उड्डाणपुलाचा भूमिपूजन कार्यक्रम होता. संविधानानुसार राजकीय पक्ष आणि सरकार दोन्ही वेगळे आहेत. परंतु भारतीय जनता पार्टीने भूमीपूजन कार्यक्रमाच्या जाहिरातीत फक्त भाजपाचाच उल्लेख केला. भाजपाचे मंत्री व आमदारांचेच फोटो जाहिरातीतल दाखवले आहेत. कोणताही सरकारी प्रकल्प जनतेने भरलेल्या कराच्या पैशातून केला जातो. कोणत्याही राजकीय पक्षाच्या पैशातून नाही. भाजपाचे नेते सरकारमध्ये असू शकतात. पण या प्रकल्पाचा खर्च भाजपाने केला आहे की सरकारने, असेही लोंढे म्हणाले.

विरोधकांना अयोग्य वागणूक

सरकारी कार्यक्रम असल्याने त्या भागातील सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले जाते. त्यांचे फोटो आणि नावही कार्यक्रमात असते. पण भाजपाने कोणताही नियम पाळला नाही.

भाजपाला जर लोकसभा निवडणुकीत 400 जागा मिळाल्या असत्या तर भाजपा म्हणजेच सरकार अशा पद्धतीने ते वागले असते. भाजप म्हणजेच संविधान, भाजपा म्हणजेच मनुस्मृती असेच ते वागले असते. भाजपा हे संविधान व लोकशाही मानत नाही हेच नागपुरातील कार्यक्रमातून दिसून आले आहे. भाजपासाठी पार्टी, संघ व मनुस्मृती हेच श्रेष्ठ आहेत, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे, असेही अतुल लोंढे म्हणाले.

Nagpur : गडकरी म्हणाले, ‘त्यांच्या मस्तकात जाते’

नागपुरातील मानकापूर भागात असलेल्या विभागीय क्रीडा संकुल परिसरातील स्पोर्ट्स हबचे भूमिपूजन करण्यात आले. मानेवाडा, म्हाळगीनगर चौकातील उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाची जाहिरात नागपूर महानगर भाजपने शहरातील अनेक वृत्तपत्रात दिली. या जाहिरातीत भाजपच्या सर्व नेत्यांचे फोटो आहेत. सरकारी विभागाकडून ही जाहिरात देण्यात आलेली नाही. सहाजिकच पक्षाने जाहिरात दिल्याने त्यात भाजपच्याच नेत्यांचे फोटो राहणार होते. मात्र या जाहिरातीवर आता काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!