महाराष्ट्र

Ramesh Chennithala : महाराष्ट्रातील सत्ताबदलाचे हादरे दिल्लीला बसणार

Congress : महायुती सरकारकडून विकासाच्या नावाखाली लूट

Congress Meeting At Amravati : राहुल गांधी यांच्या भारत जोडो व भारत जोडो न्याय यात्रेमुळे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले यश मिळाले. विधानसभा निवडणुकीतील लढाई सोपी नाही. दिल्लीत व महाराष्ट्रात विरोधकांची सत्ता आहे. धनशक्ती व सत्तेचा गैरवापर करण्यात महायुती कुप्रसिद्ध आहे. त्यामुळे गाफिल राहू नका. महाराष्ट्राची निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्रातील सत्ताबदलाचे हादरे दिल्लीलाही बसणार आहेत. त्यामुळे पूर्ण ताकदीने काम करा असे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले. विधानसभा निडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी अमरावती येथे बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. 

व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, गोवा दिव-दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, आदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, एनएसयुआय अध्यक्ष आमिर शेख आदी उपस्थित होते.

अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखेडे, चंद्रपूर-वणी-आर्णीच्या खासदार प्रतिभा धानोरकर, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख, अनिस अहमद, प्रा. वसंत पुरके, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, अमरावती शहराध्यक्ष बबुल शेखावत, जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलु देशमुख आदींचीही यावेळी उपस्थिती होती. यावेळी पटोले म्हणाले की, महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. शेतकऱ्यांच्या नावाने असलेल्या योजनेतून पैसा खाल्ला आहे. महाराष्ट्राला बेरोजगारांचे राज्य बनविले आहे.विकासाचे मॉडेल केवळ दिखावा आहे. विकासाच्या नावाखाली सर्रास लुट सुरू आहे.

Nana Patole : महाराष्ट्र वाचविणे ही काँग्रेसची प्राथमिकता

काँग्रेसची कामगिरी उल्लेखनीय

थोरात म्हणाले की, लोकसभा निवडणुकीती काँग्रेसची कामगिरी सुवर्णाक्षरांनी लिहावी अशी आहे. आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे यश दिमाखदार असले पाहिजे. महायुती सरकार बेकायदेशीर आहे. न्यायालतील निकाल वेळेवर लागला असता, तर सरकारचाच निकाला लागला असता. वासनिक म्हणाले, काँग्रेस सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) सर्वधर्म समभावावर विश्वास नाही. त्यांचे स्वयंसेवक संविधान मानत नाहीत. पंतप्रधानही स्वयंसेवक आहेत. लोकसभेत बहुमत नसल्याने भाजप सध्या संविधान बदलू शकत नाही. पण हा धोका टळलेला नाही. मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहारमध्ये अपेक्षित यश मिळाले असते, तर एनडीएचे सरकार आलेच नसते.

विदर्भातील जनता काँग्रेस व गांधी कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे असते. प्रदेश काँग्रेस कमिटीचे काम उल्लेखनीय आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस पक्षात नवचैतन्य आले आहे, असे अविनाश पांडे म्हणाले. विजय वडेट्टीवार, सतेज ऊर्फ बंटी पाटील, यशोमती ठाकूर यांनीही यावेळी राज्यातील सरकारवर चौफेर टीका केली. राज्यात परिवर्तन करून महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचे आवाहन सर्वच नेत्यांनी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!