महाराष्ट्र

Akola : काँग्रेसमधील बंडखोरी शमली, मात्र भाजपची डोकेदुखी वाढली !

Congress : डॉ. झिशान हुसेन यांची वंचितमधून एक्झिट !

Assembly Election : अकोला पश्चिम मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत सर्वाधिक बंडखोरी पाहायला मिळाली. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. दरम्यान काँग्रेसचे बंडखोर आणि वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. झिशान हुसेन यांनी पक्षाने अधिकृतरीत्या दिलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. 

मोठा धक्का

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तर काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेसमधील बंडखोरी शमली असली तरी महायुतीतील बंडखोरी कायम आहे. भाजप नेते माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदाणी यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राजेश मिश्रा यांनीही आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

वंचितच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता वंचित आघाडीकडून यावर नेमकी काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अकोला पश्चिममध्ये आता चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत अत्यंत वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत.

साजिद खान पठाण

काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात अकोला पश्चिम मतदारसंघातून महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली. 2019 मध्ये त्यांनी भाजपला कडवी झुंज दिली होती. त्यानंतर रद्द झालेल्या पोटनिवडणुकीमध्येसुद्धा काँग्रेसने साजिद खान पठाण यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसकडून 18 जण इच्छुक होते. गंभीर गुन्ह्यांमध्ये पठाण यांचे नाव असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती.

अखेर काँग्रेसने पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांनाच अकोला पश्चिममधून निवडणूक रिंगणात उतरवले. पक्षाच्या या निर्णयामुळे इतर इच्छुकांमध्ये नाराजी होती. काँग्रेसचे माजी मंत्री अजहर हुसेन यांचे पुत्र तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. झिशान हुसेन यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून निवडणूक लढण्यासाठी ‘वंचित’ची वाट निवडली होती. वंचित आघाडीने डॉ. हुसेन यांना अकोला पश्चिममधून उमेदवारीदेखील जाहीर केली होती. त्यांनी वंचित आघाडीचा एबी फॉर्म घेत उमेदवारी अर्ज दाखल केला. मतविभाजन होऊन त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता होती.

नागपुरात अनिस अहमद तर अकोल्यात डॉ. हुसेन काँग्रेसचा हा राजकीय डाव ?उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (ता. 4) वंचितचे उमेदवार डॉ. झिशान हुसेन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार असतानाही डॉ. हुसेन यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे वंचितला मोठा धक्का बसला. आता अकोला पश्चिम मतदारसंघात वंचितचा उमेदवार नाही. नागपूरमध्ये अनिस अहमद यांनी वंचितमध्ये प्रवेश करीत एबी फॉर्म घेतला, वेळेअभावी उमेदवारी दाखल केली नसल्याचे चित्र निर्माण केले. त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. आता अकोल्यात सुद्धा काँग्रेसचे डॉ. झिशान हुसेन यांनी वंचितकडून उमेदवारी दाखल केल्यानंतर अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसचा हा राजकीय डाव असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड, भाजपचे माजी नगरसेवक संजय बडोणे आदींनीदेखील अपक्ष भरलेला अर्ज मागे घेतला.

Halba Community : विधानसभा निवडणुकीत दाबणार ‘नोटा’चे बटन

डॉ. हुसेन म्हणतात.. माफ करा !

साजिद खान पठाण यांना काँग्रेस पक्षाने उम्मेदवारी दिली. डॉ. झिशान हुसेन यांनी बंड पुकारत वंचितमध्ये प्रवेश केला आणि अकोला पश्चिम या मतदारसंघातून उम्मेदवारी मिळवली होती. मात्र ऐन वेळेवर वकील पाठवून अर्ज मागे घेतला. यांनतर डॉ. हुसेन यांनी वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर, प्रा. अंजली आंबेडकर यांची माफी मागितली. वैयक्तिक कारणामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!