Congress News : पहिल्या दोन टप्प्यातील मतदान आपल्या विरोधात झाल्याची जाणिव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाली आहे. त्यामुळे आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत. आज एका आघाडीच्या दैनिकात पहिल्या पानावर कुठे जल्लोष व्हायला पाहिजे हे भारतात की पाकिस्तानात हे पाहून मतदान करा अशी जाहिरात दिली आहे. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला. आणि राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी माहिती दिली.
भाजपसोबत त्यांचे सहकारी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी ही जाहिरात दिली आहे. लोंढे म्हणाले, पाकिस्तान मध्ये जाऊन बिर्याणी खाणारा पंतप्रधान पाहिजे की मणिपूर मध्ये जाऊन पीडितांचे सांत्वन करणारा पंतप्रधान पाहिजे अशी आम्ही जाहिरात देऊ शकतो.
आमच्याकडे कार्यक्रम आहे, भाजपकडे काही कार्यक्रम नाही
आम्ही यापूर्वी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, राम सातपुते, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात तक्रार केली होती. तसेच निवडणूक आयोगाला कारवाई करायला एवढा वेळ का लागतो याबाबत आम्ही विचारणा केली. निवडणूक आयोगाकडे आम्ही पुरावे दिले आहेत असे लोंढे म्हणाले.
भाजप, अजितदादा गट आणि शिंदे गटाच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी आम्ही आज राज्याच्या निवडणूक अधिका-याकडे केली आहे, असे अतुल लोंढे यांनी माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.