महाराष्ट्र

Congress : पुतळा कोसळल्यानंतर सरकारविरोधात निदर्शने

Prithviraj Chavan : जबाबदारी स्वीकारत सरकारने राजीनामा द्यावा 

Chhatrapati Shivaji Maharaj : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला. या माध्यमातून राजकीय इव्हेंट करीत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन केले. लोकसभेसाठी त्याचा हा इव्हेंट केला. महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला. काम निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळेच पुतळा कोसळला. यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेलाच धक्का बसला आहे. राजकोट किल्ल्यावर घडलेल्या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करावी. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी मालवणला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या दृष्टीने शिवछत्रपतींचा पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आहे. सरकारने उद्घाटनाची घाई केली. त्याचा मोठा इव्हेंट केला. अनुभव नसलेल्या व्यक्तीला पुतळा उभारणीचे काम सरकारने दिले. हे अपयश शौर्याचा इतिहास असलेल्या नौदलाच्या माथी मारण्याचे प्रयत्न आहेत.

राज्यभरात निदर्शने

सरकारने या घटनेबाबत संपूर्ण जनतेची माफी मागावी. प्रत्यक्षात पुतळा उभारणी वेळी राज्य सरकारचे कला संचालनालय काय करत होते? असा प्रश्नही सतेज पाटील यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्या घटनेच्या विरोधात काँग्रेसने आंदोलन केले. महायुती सरकारचा निषेध केला. पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavhan) यांच्या नेतृत्वाखाली कराड येथे आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे, तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Devendra Fadnavis : महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण नको

कोल्हापुरातील (Kolhapur) छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीने निदर्शने केली. काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेना उपनेते संजय पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, तौफिक मुल्लाणी आंदोलनात सहभागी झालेत. जळगाव खानदेश (Jalgaon) येथे प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे, शहर काँग्रेस अध्यक्ष शाम तायडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. नाशिक (Nashik) येथेही निषेध करण्यात आला. शहर काँग्रेस अध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांच्या नेतृत्वात प्रदेश सचिव राहुल दिवे, युवक काँग्रेसचे राहुल पाटील, सुदेश आण्णा मोरे आदींनी आंदोलन करून सरकारचा निषेध केला.

error: Content is protected !!