Political war लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर काँग्रेसच्या पराभवाचे खापर राहुल गांधी, प्रियंका गांधी वाद्रा यांच्यावर नसून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर फोडणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी केला. कुशीनगर, सालेमपूर आणि चंदौली लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या रॅलींना संबोधित करताना ते बोलत होते.
नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान
या लोकसभा निवडणुकी नंतरही नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील आणि काँग्रेसचे लोक इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनला दोष देतील, असा दावा गृहमंत्र्यांनी केला. एनडीएच्या विजयाची खात्री त्यांच्या बोलण्यात जाणवत होती.
खरगे यांची नोकरी जाणार
4 जूनला मोदींचा आणि भाजपचा विजय निश्चित आहे. तुम्ही बघाच 4 तारखेला दुपारी राहुल गांधी यांचे लोक पत्रकार परिषद घेणार आणि ईव्हीएममुळे आमचा पराभव झाला. हे होणारच आहे, यांचा ठपका खरगे यांच्यावर पडणार असून त्यांची नोकरी जाणार आहे.
10 वर्षाच्या मोदी सरकारच्या कार्यकाळात प्रचंड विकास कामे झाली. 370 कलम हटले, अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर उभे झाले, राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य दिले, जगात देशाचा सन्मान वाढला. त्यामुळे या निवडणुकीत एनडीए यशस्वी होणारच असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.