Nagpur Constituency : कॉंग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे आम्हाला बहुजन समाज पार्टी स्थापन करावी लागली. संविधानात्मक अधिकार मिळाले असते तर बहुजन समाज पार्टी बनवण्याची गरज पडली नसती असे बसपाच्या सर्वेसर्वा मायावती नागपूरला बोलताना म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आल्या असताना त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले.
अन्यायाचा पाढा वाचताना त्या म्हणाल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने भारतरत्न दिले नाही. आंबेडकर यांच्या निधनानंतर केंद्रात काँग्रेस सत्तेत होती. मागासवर्गीय लोकांना मंडळ कमिशन काँग्रेसने लागू न केल्याने मोठे नुकसान झाले. बहुजन समज पार्टीला मंडळ कमिशन लागू करण्यासाठी संघर्ष करावा लागला. व्ही. पी. सिंग सरकारच्या काळात पाठिंबा मागितला तेव्हा आम्ही अट ठेवून समर्थन दिले. आणि बसपाच्या प्रयत्नाने आंबेडकर यांना भारतरत्न दिले. तसेच मंडळ कमिशन लागू झाले.
Lok Sabha Election : वडेट्टीवार करणार भाजपमध्ये लवकरच प्रवेश, कोण म्हणालं असं!
जुमलेबाजी चालणार नाही
अच्छे दिनचे स्वप्न आणि गॅरंटीची हमी यातून काहीही हाती लागले नाही हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे भाजपची जुमलेबाजी चालणार नाही असे मायावती म्हणाल्या. भाजपचा वेळ मोठ्या उद्योजकांना श्रीमंत करण्यासाठी जातो आहे हे देखील लोकांच्या लक्षात आले आहे.निवडणूक रोख्यांवर आमच्या पक्षाला पैसे मिळाले नाही असे मायावती यांनी स्पष्ट केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या विषयात लक्ष घालणे योग्य होते.
शेतकरी दुःखी
देशातील शेतकरी भाजपच्या धोरणांमुळे दु्:खी असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच गरीब, दलित आदिवासी, अल्पसंख्याक समजाचा विकास होऊ शकला नाही. मागासवर्गीयांना आरक्षणाचा फायदा झाला नाही. मुस्लिम आणि अन्य समाजाची स्थिती वाईट आहे. भाजप शासनाच्या काळात सामान्य नागरिकच नाही तर व्यापारी वर्ग दुःखी आहे.देशात महागाई वाढली आहे. बेरोजगारी वाढली इतकेच नव्हे तर देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत. त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजपला सत्तेत येण्यापासून रोखायचे आहे. साम दाम दंड वापरून केंद्रात सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे त्यामुळे सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन मायावती यांनी केले.
बापाला साथ द्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काशीराम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बसपाला साथ द्यावी असे आवाहन मायावती यांनी केले. तसेच झालेल्या चुका सुधारण्याची ही वेळ आहे ती हातची जाऊ देऊ नका असे त्या म्हणाल्या.