महाराष्ट्र

Vikas Thakre : नागपुरात विरोधकांसाठी एकटाच भारी

Congress Stand : सुषमा अंधारे नागपुरात येऊन काय साध्य करणार?

Accident Case : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या कार मुळे नागपुरात अपघात घडला. याप्रकरणात जो आरोपी असेल, त्याला शिक्षा झाली पाहिजे. हिच आपली भूमिका आहे. आपल्या बोलण्याचा कुणी विपर्यास करीत असेल, तर त्याला नाईलाज आहे. 1984 पासून आपण भाजपशी लढण्याचे काम करीत आहोत. लोकांनी आपल्याला आतापर्यंत निवडून दिले आहे. नागपुरात भाजपशी लढताना आपल्याविरोधात 40 केसेस दाखल झाल्या आहेत. नागपुरात कसे लढायचे, हे आपल्याला ठाऊक आहे. नागपुरात विकास ठाकरे एकटा भारी आहे, असे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे म्हणाले.

विरोधात लढू

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना नागपुरात येऊन काय साध्य करायचे आहे, हे ठाऊक नाही. पण आपल्याला येथे आयुष्यभर भाजपच्या विरोधात लढायचे आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात लढलो आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विरोधात लढलो. यापुढेही भाजपच्या विरोधात लढत राहणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.

खचत नाही

कोणी कितीही खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी, खचत नाही. संघर्षातून नेता तयार होतो. हे नागपूरने पाहिले आहे. लोकांचा विश्वास संपादन करून काँग्रेसच्या तिकीटावर आपण निवडून येत आहे. आपल्याला कुणाच्या ‘सर्टिफिकेट’ची गरज नाही. आपण 36 तास गप्प नव्हतो. प्रचास माध्यमांचे प्रतिनिधी विचारायला आले, तेव्हा आपण बोललो. त्यामुळे गप्प राहिलो, या आरोपात दम नाही. सुषमा अंधारे यांनी पुण्यात (Pune) आंदोलन केलं होतं. त्या नागपुरातही करू शकतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या विरोधात जर त्यांनी गुन्हा दाखल करून दाखवला, तर सर्वाधिक आनंद आम्हालाच होईल. काँग्रेसची लढाईच भाजपच्या विरोधातच आहे, असे ठाकरे म्हणाले.

कोणाच्याही आरोपांनी आपल्यावर कोणताही फरक पडत नाही. आपण जनतेची कामे करतो. हे आपले काम आहे. आपल्या मतदारसंघातील ही घटना आहे. या घटनेतील जो आरोपी असेल, तो वाचणार नाही. जो निर्दोष आहे, त्याला शिक्षा होणार नाही. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांबद्दल आपण बोलणार नाही. आपल्याला जे बोलायचं ते आपण काँग्रेस पक्षाकडे बोलतो. आपण आपल्या बाजूने महाविकास आघाडीतील नेत्यांना दुखवत नाही. दुखावणार नाही.

Devendra Fadnavis : भाजपने ग्रहशांतीची पूजा करावी !

नागपुरात जागा नाही

जयंत पाटील (Jayant Patil) यांना तिकीट मागण्याचा अधिकार आहे. पण यापूर्वी त्यांचे किती उमेदवार लढले. त्यांनी किती मते घेतली, याचा अभ्यास झाला पाहिजे. हे झाल्यास त्यांना नागपुरात एकही जागा मिळू शकत नाही. आमच्या ‘हायकमांड’ने आदेश दिल्यास सर्व जागांवर त्यांना मदत करू, असेही विकास ठाकरे म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या नावाने असलेल्या कारमुळे गुन्हा घडला आहे. यातील जे आरोपी असतील, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. हिच आपली भूमिका आहे. आपल्या बोलण्याचा कोणी विपर्यास करू नये, असेही आमदार विकास ठाकरे म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!