Congress News : देशासाठी काँग्रेस लढली, अनेक जण फासावर चढले मात्र, मोदींनी काय केले असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. मोदी सरकारच्या कारभारावर त्यांनी ताशेरे ओढले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक देशाला महान करायचे म्हणतात पण आरएसएसचे लोक इंग्रजांच्या नोकरीत होते. स्वातंत्र्याच्या लढ्यात कुठे गेले होते? कुठे बसले होते. तसेच मोदींनी काय केले.देशवासीयांची फसवणूक केली. पंतप्रधान झालो तर युवकांना नोकरीचे आश्वासन दिले. दहा वर्षांत किती लोकांना नोकरी दिली याचे उत्तर भाजपकडे नाही.
10 वर्षात किती घर बांधली
10 वर्षांत किती घरे बांधून दिली याचे उत्तर सत्ता पक्षाकडे नाही असा आरोप करून खर्गे म्हणाले,
आता मोदी म्हणतात मोदीची गॅरंटी पण यापूर्वीची गॅरंटी कोणाची होती मग ? विकासाबाबत गॅरंटी नव्हती का असा प्रश्न उपस्थित केला.
धमकी देऊन भाजप मध्ये घेतले
भाजप सोबत असलेल्या 23 नेत्यांना धमकी देऊन भाजपमध्ये सामावून घेतले. आमचे सदस्य असताना त्यांना भ्रष्ट म्हणायचे आणि आता तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहात. अमित शाह कडे मोठी वॉशिंग मशीन आहे. मोदी त्यांना सोपवतात आणि अमित शहा त्यांना वाॅशिग मशीन मध्ये धुऊन काढतात आणि गडकरी त्याला बाहेर काढण्याचे काम करतात.
राहुल गांधींनी रोजगार देण्याचे आश्वासन दिले
काँग्रेस नेते राहुल गांधींनी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याची वॉरंटी देतात. मोदीजी सारखं नाही, ते गॅरंटी देतात मात्र वॉरंटी देत नाहीत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मोठमोठ्या संस्था उभा केल्या. टेक्निकल इन्स्टिट्यूट केले. भारत सरकारच्या अनेक कंपन्या बनवल्या. मात्र, त्यांना विकण्याचे काम मोदी सरकार करत आहे.
एक विकत घेणारा आणि विकणारा हे दोघे मिळून देश चालवत आहे.
अयोध्यात आम्ही गेलो नाही तर आम्हाला शिव्या देतात. ते शंकराचार्य सुद्धा गेले नाही त्यांना शिव्या द्या. त्यांना मात्र ते बोलणार नाही. कारण त्यांना बोलले तर ते संपून जातील ही भीती वाटते. राम मंदिरात उद्घाटनाच्या वेळेस राष्ट्रपतींना का नेले नाही, या विषयी खर्गे यांनी प्रश्न उपस्थित केला.
तर लोकशाही धोक्यात
यावेळी चुकीने भाजप आणि आरएसएसवाले निवडून आले तर पुन्हा निवडणुका होणार नाही. ते संविधान आणि लोकशाही संपवून टाकतील. हुकूमशाहीवर विश्वास असलेले हे लोकं आहेत. अशा लोकांना निवडून देऊ नका लोकशाही वाचवा संविधान वाचवा. लोकशाहीला वाचवण्याचा नाराही मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी दिला. राहुल गांधींचे हात मजबूत करून लोकशाही वाचवा, असा पुनरुच्चार मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.