पुण्यातील हीट अॅंड रन प्रकरणानंतर रात्री उशीरापर्यंत चालणारे बार, पब्स आणि रेस्टॉरेंटवरही कारवाई करावी, यासाठी पुणेकर रस्त्यावर उतरले. तर याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार आक्रमक झाले आहेत. पुण्याप्रमाणे नागपुरातही असेच बार आणि पब्स सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तात्काळ कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात लोकहितशी बोलताना प्रशांत पवार म्हणाले, नागपूर शहरात काही बार व पब काँग्रेस नेत्यांचेसुद्धा आहेत. विरोधकांवर आरोप करण्यापूर्वी राहूल गांधी यांनी याची माहिती घ्यावी. त्या काँग्रेस नेत्यांची नावे विचारली असता, ती उघड करण्यास मात्र त्यांनी नकार दिला. काँग्रेस नेतेच असे धंदे करत आहेत. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांनी उगाचेच आरोप करण्यात काही अर्थ नाही. आधी यांची दुकाने बंद करा आणि मग इतरांवर आरोप करा, असेही पवार म्हणाले.
हॉटेल्सखाली वाहने अवैध प्रकारे लोकांच्या घरासमोर उभी केली जातात. याचा मनस्ताप नागरीकांना सोसावा लागतो. शहरात मागील 2 महिन्यांत मध्यरात्री पब, हॉटेल्समध्ये मारापीटीचे प्रकार झालेले आहेत. हुडकेश्वर रोडवर खूनसुध्दा झाला आहे. बजाज नगर येथील पबमध्ये मागील महिन्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांनी दारूची बाटली एका व्यक्तीवर फोडल्याचा प्रकार घडला. मद्यधुंत अवस्थेत दारू पिऊन वाहने जोरात चालविणे, धिंगाणा घालणे असा प्रवृत्तीच्या गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. यावर पोलिस यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रशांत पवार यांनी म्हटले आहे.
नगर रचना विभागकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष..
शहरातील बहुतांश निवासी इमारतीच्या टेरेसवर पब, रेस्टॉरेंट, हॉटेल्स सुरू आहेत. रहिवाशी इमारतीत विनापरवाना हॉटेल चालविण्याची परवानगी नाही. पालिकेच्या नगर रचना विभागकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. इमारतीमध्ये गाळेधारकांनाच पार्किंग उपलब्ध असताना अवैध हॉटेलमध्ये आलेले ग्राहक रस्त्यावर कुठेही वाहने उभे करून देतात. या कारणाने वाहतूक विस्कळीत होत असते, वाहतूक विभागकडून कारवाई केली जात नाही.
Finance Sector : ‘रंगनाथ’च्या चौकशीची गती मंद, ‘हे’ आहे कारण !
सायलेंस झोनमध्येही धिंगाणा..
सिव्हील लाईन शांत झोन असूनसुध्दा रूफटॉप हॉटेल्स सुरू झाले आहेत. रात्रभर म्युझिक सुरू असते. या समोरच वाहतूक विभागाचे ऑफीस आहे, मागच्या बाजुला पालिकेचे ऑफीस आहे. इमारतीकडे फायर एनओसीसुध्दा नाही. अनेक ठिकाणी डीजे कर्कश आवाजात सुरु असतात. रात्री 10 वाजताचे नियम धाब्यावर बसविले आहेत. मध्यतंरी टेरेसवरील काही हॉटेलांवर कारवाई झाली होती. यानंतरही टेरेसवरील हॉटेलांची संख्या मोठया प्रमाणात वाढली. याची चौकशी करून नियमबाह्य बार चालू असताना डोळेझाक करणाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करायला पाहिजे, असे प्रशांत पवार म्हणाले.