महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : राज्यात मुख्यमंत्र्यांची लाडका बिल्डर योजनाही कार्यरत

Congress : अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या घशात 400 कोटी

 Housing Scam : महाराष्ट्रात आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार, मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना सुरू झाली आहे. प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या चढ्ढा नावाच्या विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनाने बिनव्याजी 400 कोटी रुपये मंजूर केले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही टीका केली आहे. सरकारच्या भ्रष्ट कारभाराची आपण पोलखोल करीत असल्याचे ते यावेही म्हणाले. मुंबईतील प्रचितगड या शासकीय निवासस्थानी त्यांनी सोमवारी (ता. 22) प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली. 

सरकारने आपली तिजोरी खासगी बिल्डरसाठी खुली केली आहे. हा सरकारी तिजोरीवर दरोडा आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हा निर्णय मान्य आहे का? हा प्रश्न देखील त्यांनी केला. चढ्ढा डेव्हलपर्स आणि प्रमोटर या दिल्लीस्थित कंपनीवर सरकारने कृपा केल्याचे वडेट्टीवार म्हणाले. 2021 मध्ये या विकासकासोबत म्हाडाने करार केला. आतापर्यंत एकाही घराचा ताबा बिल्डरने लाभार्थ्यांना दिलेला नाही. असे असताना त्याला 400 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. गृहनिर्माण विभागातील हा गैरप्रकार असल्याचे ते म्हणाले. हा निधी देण्यासाठी कोणी दबाव आणला, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. डिंपल चड्डा याच्याविरोधात सीबीआयने कारवाई केल्यावर तो तुरूंगात गेलर आहे. अशात हा बांधकाम व्यावसायिक राज्य सरकारचे पैसे घेऊन परदेशात पळून गेला तर? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची मागणी

बार्टीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षापासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली. तरीदेखील सरकारला जाग येत नाही. सरकारची शिष्यवृत्ती द्यायची मानसिकता नाही.

Ladki Bahin Yojana : भंडाऱ्यात लागतोय दोनशे रुपयाचा भुर्दंड

कमिशन, टक्केवारी जिथे मिळत नाही तिथे सरकार पैसे खर्च करत नाही. अशी या सरकारच्या कामाची पद्धत आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. महाज्योती आणि सारथी या संस्थांच्या विद्यार्थ्यांची देखील अशीच परिस्थिती आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सरकारने शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.

विदर्भात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली, चंद्रपूर येथे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर परिसरात देखील अशीच परिस्थिती आहे. सुरक्षितस्थळी लोकांना हलविण्यात आले आहे. सरकारने त्यांच्या निवारा, भोजन, आरोग्याची व्यवस्था करावी. पशुधन देखील अडचणीत आहे. पशुधन वाचविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!