महाराष्ट्र

Lok Sabha Election : शिंदेच्या सात खासदारांची गती काय? ‘घर का ना घाट का…’

Congress Leader Wadettiwar : शिंदे गटाचे निम्मे आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत.

Bjp Vs Congress : सद्यःस्थितीत विद्यमान सरकारची तानाशाही सुरू आहे. सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात राग आहे. त्यामुळे विदर्भात काँग्रेसला अनुकूल परिस्थिती आहे. काँग्रेसच्या बाजूने लोकांचा कल आहे. भाजपला धडा शिकवण्याचे जनतेने ठरवलेले असून या निवडणुकीच्या निकालात ते दिसणार आहे, असे राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. शिंदे सेनेवर वडेट्टीवारांनी सडकून टिका केली. शिंदेंच्या सात खासदारांची गती झाली आहे. ‘घर का ना घाट का..’, अशी अवस्था झाल्याचे ते म्हणाले.

शिंदे गटाचे निम्मे आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. ते आज (ता. 5) नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, गडचिरोलीत निगेटिव वातावरण असल्यानं गडचिरोलीचे भाजपचे उमेदवार अशोक नेते पडणार आहेत. अशा लोकांना जनता जास्त काळ सहन करत नाही. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत विचारले असता, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी तसाही जाणारच होतो, प्रचार सभेला 9 आणि 10 तारखेला जाणार आहे आणि पक्षाचा प्रचार करणार आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातही पक्षाचे काम उत्तम सुरू आहे. आम्ही सर्व जण ताकदीने काम करत आहोत. राहुल गांधींची सभा झाल्यानंतर वातावरण पूर्णपणे बदलले दिसेल. १९ एप्रिलला ज्या लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे, त्या पूर्व विदर्भाच्या पाचही मतदारसंघात आमची स्थिती भक्कम आहे. राहुल गांधीच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. या निवडणुकीनंतर संपूर्ण जगाला दिसून येईल की, जनता कुणासोबत आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

Lok Sabha Election : पडती बाजू सांभाळण्यासाठी राहुल, प्रियांकाच्या विदर्भात सभा

सांगली मतदारसंघात उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये चढाओढ बघायला मिळत आहेत. उमेदवारीसाठी नेत्यांमध्ये संघर्ष बघायला मिळतो आहे. याबद्दल विचारले असता, सांगलीमध्ये वाद-विवादाचा विषयच राहणार नाही. कारण ती जागा काँग्रेसची होती आणि काँग्रेसचीच राहणार आहे. या सगळ्या वादात आम्हाला ताणून घ्यायचे नाहीये. आमचे हायकमांड याबाबत निर्णय घेतील आणि तो निर्णय सर्वांना मान्य असेल.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!