महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : सरकार योजनांमधून मतं खरेदी करीत आहे

Congress : लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवार यांची टीका

Maharashtra Assembly Election : राज्य सरकारने लाडकी बहिण योजना काढली आहे. या शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. परंतु आमच्या बहिणी त्यांना भीक घालणार नाही, अशी खरमरीत टीका विधानसभेचे (Vidhan Sabha) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर केली. ‘लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारी पैशातून मतं खरेदी करण्याचा प्रकार आहे. हा प्रकार जनतेने ओळखला आहे. बहिणांना अर्थसहाय्य करण्याची सद्बुद्धी सरकारला वर्षभरापूर्वी का मिळाली नाही? निवडणुकीच्या तोंडावरच सरकारने योजना का जाहीर केली?’ असा सवालही वडेट्टीवार यांनी सरकारला केला. 

वडेट्टीवरार म्हणाले की, लाडकी बहीण योजना जाहीर केल्यातून काही निष्पन्न होणार नाही. शासकीय निधी खर्च करून मतं मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) सत्ताधाऱ्यांना जागा दाखवून दिली आहे. विधानसभा निवडणुकीतही मतदार हेच करतील असा विश्वासही वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला व्यक्त केला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, मराठवाड्यातून शेतकऱ्यांच्या 350 डीपी चोरीला गेल्या आहेत. त्यावर सरकारचचे लक्ष नाही. शेतकऱ्यांचे 46 हजार कोटी रुपये दिलेले नाहीत.

सामान्य भरडला जातोय

आपत्तीग्रस्तांच्या नावाला 15 हजार कोटी सांगत शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करीत आहे. बीडमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीच्या नावाने लाटल्या. सरकार केवळ आम्ही खोटे ‘नॅरेटिव्ह सेट’ करीत असल्याचे सांगते. आम्ही काय खोटे ‘नॅरेटिव्ह सेट’ केले हे त्यांनीच सांगावे. ‘दुध का दुध और पानी का पानी.’ तुम्हीच किती खोटं बोलत आहात, हे लोकांना दिसत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. मराठवाड्यातून शेतकऱ्यांच्या (Farmer) डीपी चोरीला गेल्याच्या विषयावर सरकार गप्प आहे. त्यावर सरकार का बोलत नाही?

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार-प्रसार सुरू आहे. या योजनेचे विरोधकही स्वागत करतात. असे असताना महायुतीने विरोधाकांना कोंडीत पकडले आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनाचा अर्ज उपलब्ध करून दिला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अर्जावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि अदिती तटकरे यांचा फोटो आहे. हा पक्षाचा आणि नेत्यांचा प्रचार नाही का? विधानसभा निवडणुकीपूर्वी हा प्रचार का केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने अनेक ठिकाणी चित्ररथ पाठवून सरकारी योजनांचा प्रचार केला होता. या रथावर मोदी सरकार असे लिहिलेले होते. भारत सरकार ऐवजी मोदी सरकार असे लिहिण्यात आल्याने राज्यात अनेक ठिकाणी विरोध झाला. विदर्भातील अनेक गावांमधून हा चित्ररथ लोकांनी परत पाठवला. अधिकाऱ्यांना जाब विचारला.

Maharashtra Police : वयोमर्यादेच्या अटीत अखेर मिळाली वाढ 

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने मोदींचा (Narendra Modi) प्रचार केला. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील असाच प्रचार लाडकी बहीण योजनेच्या अर्जावरून सुरू असल्याकडे वडेट्टीवार यांनी जनतेचे लक्ष वेधले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!