महाराष्ट्र

Assembly Session : मुंबई वाचविण्यासाठी वडेट्टीवारांचे रौद्ररूप

Congress Attack : सरकारवर आक्रमकपणे केला प्रहार

Mumbai Scam : मुंबईती वाढत चाललेल्या गैरप्रकाराच्या मुद्द्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार रौद्ररूप घेतले. सरकारला धारेवर धरत त्यांनी मुंबई सरकारने विकायला काढली, असे टीकास्त्र सोडले. मुंबईतील अनेक रहिवासी अद्यापही वाऱ्यावर सोडल्याचे ते म्हणाले. विधानसभेत वडेट्टीवार चांगलेच संतापलेले बघायला मिळाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी देखील यासंदर्भात सरकारला धारेवर धरले.

सरकारने केलेल्या विविध योजनांमध्ये कशाप्रकारे भ्रष्टाचार झाला, याचा पाढाच वडेट्टीवार यांनी वाचून दाखविला. दुग्धविकास विभागाच्या कामकाजावर त्यांनी तोशेरे ओढले. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe) हे भ्रष्टाचारापुढे झुकले नाही. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. सरकारच्या भ्रष्टाचाराचा त्यांनी निषेध व्यक्त केला.

मुंबई विकणार

काही नेत्यांच्या इशाऱ्यावर सरकारने मुंबई विकायला काढली आहे. मुंबई देशाची राजधानी आहे. त्यामुळे मुंबईवर आधीपासूनच अनेकांचा डोळा आहे. अशात मुंबईतील अनेक योजना अशा प्रकारे राबविण्यात आल्या, ज्यातून इतर राज्यांना फायदा होईल.

NDCC Bank Scam : सुनिल केदार यांना शिक्षेतून दिलासा नाही

सरकारने जरी मुंबई विकायला काढली असली तरी तसे होऊ देणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील यामुद्द्यावर वडेट्टीवार यांना साथ दिली.

सभागृहात न्याय मिळत नसल्याने काँग्रेसने घोषणाबाजी करीत सभात्याग केला. त्यानंतर वडेट्टीवार यांनी विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना (Shiv Sena) आमदार आदित्य ठाकरे हे देखील यावेळी सोबत होते. सरकारने अदानी यांच्या कंपनीला फायदा मिळवून दिला असा आरोपही वडे‌ट्टीवार यांनी यावेळी केला. सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. परंतु विधानसभेत त्यावर चर्चा करण्यात आली नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!