महाराष्ट्र

Ramesh Chennithala : राज्यातील जनतेला परिवर्तन पाहिजे

Congress : केंद्र सरकारची महाराष्ट्राला सापत्न वागणूक

Mahavikas Aghadi : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या तयारीचा आढावा सर्वच पक्षांकडून घेण्यात येत आहे. काँग्रेसही यात आघाडीवर आहे. आतापर्यंत काँग्रेस पक्षाने 172 मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. उर्वरित मतदारसंघांचा आढावा पूर्ण होणार आहे. राज्यातील वातावरण महाविकार आघडीसाठी अनुकूल आहे. परिवर्तन करण्याची जनतेची मानसिकता आहे. लोक भ्रष्ट महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचतील. दोन तृतीयांश बहुमताने आघाडीचे सरकार येईल असा, विश्वास महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

महागाईत वाढ 

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. महिलांवरील अत्याचारात वाढले आहेत.पुण्यात तीन दिवसात दोन हत्या झाल्या. महागाई नियंत्रणाबाहेर गेली आहे. सण, उत्सव साजरे करणे अवघड आहे. जनता त्रस्त आहे. महायुती सरकार घोटाळ्यात व्यस्त आहे. पैसे वसूल करण्यात येत आहेत, असे चेन्नीथला म्हणाले.

पटोलेंचाही प्रहार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, मराठवाडा व विदर्भात पुराने थैमान घातले आहे. सुमारे 12 लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. रस्ते, पुल वाहून गेले. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राकडे लक्ष देत नाही. तेलंगण आणि आंध्र प्रदेशात पूर आल्यानंतर दोन केंद्रीय मंत्रालयं तैनात करण्यात आली. कृषी मंत्री व अर्थमंत्री तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रात मात्र वाऱ्यावर आहे. केंद्राचे पथकही आले नाही. केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला अजून मदत मिळालेली नाही. महायुतीचे नेते केंद्राकडे मदत मागत नाहीत, असे पटोले म्हणाले.

Nana Patole : मराठवाड्यातील पालकमंत्री झाले गायब 

फडणवीस खोटे बोलतात

गुंतवणूक वाढली असा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा दावा आहे तर मग राज्यात बेकारीचे प्रमाण प्रचंड का आहे? बेकारी कमी का होत नाही? याची उत्तरे फडणवीस यांनी द्यावीत. भाजपा व फडणवीस सातत्याने खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत, असेही पटोले म्हणाले. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त आदी याप्रसंगी उपस्थित होते. उपस्थित काँग्रेस नेत्यांनाही यावेळी महायुती सरकारवर टीका केली. काँग्रेसच्यावतीने राज्यभरात सरकार विरोधात सुरू असलेल्या आंदोलनांची माहिती देखील यावेळी देण्यात आली. निवडणुकीत विजयाचा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!