महाराष्ट्र

Ramesh Chennithala : प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी

Congress : भाजपा दुतोंडी साप; पैसा वसुलीचे काम

Political Criticism : भारतीय जनता पार्टीचे सरकार शेतकरी विरोधी आहे. सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान उत्पादक शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. शेतकरी निर्यात करु शकत नाही. सरकार काहीच पावले उचलत नाही. शेतकरी आत्महत्या करत आहे. महागाई व बेरोजगारीने जनता त्रस्त आहे. भाजप सरकार टेंडर काढणे, भ्रष्टाचार आणि पैसा वसुली एवढेच काम करत आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.

प्रदेश काँग्रेसची विभागीय आढावा बैठक चंद्रपुरात (Chandrapur) संपन्न झाली. यावेळी चेन्नीथला बोलत होते. प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धनोरकर, खासदार नामदेव किरसान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार अभिजित वंजारी, आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री अनिस अहमद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, रामकिशन ओझा, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे आदी उपस्थित होते.

पटोलेंचा हल्ला 

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आशिर्वादाने नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान झाले. पंतप्रधान झालो तर पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाइलवर करेल हे वचन त्यांनी मोडले.डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करेन असे ते म्हणाले होते. शेतकऱ्यांविरोधात तीन काळे कायदे आणून शेतकऱ्यालाच उद्ध्वस्त करायचे धोरण मोदी व भाजपाने आणले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करेन असे नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये विदर्भाच्या भूमितूनच सांगितले होते. पण त्यानंतर मात्र मोदींनी, हे तर चुनावी जुमले होते, असे म्हणत पलटी मारली.

शेतकऱ्यांचे काय?

शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, खलिस्तानी, नक्षलवादी, अतिरेकी म्हणून त्यांचा अपमान केला. आता निवडणूक आली म्हणून मोदींना शेतकऱ्यांची आठवण झाली. वर्ध्याच्या (Wardha) सभेत मोदी म्हणाले की, शेतकरीच पोशिंदा आहे. विरोधी पक्षात असताना भाजपाने सोयाबिनला 6 हजार रुपये भाव मिळावा म्हणून मोर्चा काढला. आता ते 4 हजार रुपये भाव देत आहेत. खतांचे भाव वाढले आहेत. इंधनाचे भाव वाढलेले आहे. पण शेतमालाचा भाव वाढला नाही, असे पटोले म्हणाले.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकसभा निवडणुकीला लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी जनतेने मतदान केले. महायुती (Mahayuti) सरकारची जडण घडणच भ्रष्टाचारातून झाली आहे. सत्तेवर जाण्यासाठी शिवसेना (Shiv Sena) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची तोडफोड केली. राज्यात शांतता सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिला अत्याचार वाढले आहेत. अंमली पदार्थांचा काळा धंदा वाढला आहे. त्यामुळे लोकसभेपेक्षा विधानसभेला चांगला प्रतिसाद मिळेल व महाविकास आघाडी सत्तेवर नक्की येईल, याचा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

Ramesh Chennithala : राज्यातील जनतेला परिवर्तन पाहिजे

अस्मिता गुजरात कडे गहाण 

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्राची अस्मिता गुजरातकडे गहाण ठेवली आहे. 28 प्रकल्प गुजरातला पळवले आहेत. प्रकल्प गेला नाही असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सांगतात. पण 18 हजार कोटी रुपयांचा सोलर पॅनलचा प्रकल्प गुजरातला पळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील त्यांच्या भाषणातून लाडकी बहीण योजनेवर टीका केली. महाराष्ट्रात मात्र तीच योजना मोठ्या जोशात सुरू आहे. महाराष्ट्रात एक बोलायचे. झारखंडमध्ये दुसरे बोलायचे हा दुटप्पीपणा आहे, असे ते म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!