Political War : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली आहे. हत्या, खून, दरोडे, बलात्कार यांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात दिवसाढवळ्या दोन खून झाले. राज्यात शांतता राखण्यात महायुती सरकार अपयशी ठरली आहे. कायदा सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. सरकारचे लक्ष मात्र घोटाळे करून पैसा वसुल करण्याकडे आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी केला.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहर व ग्रामीण, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पुण्यात झाली. या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील आदी नेत्यांची उपस्थिती होती.
वाहतुकीची समस्या
चेन्नीथला म्हणाले, ‘पुणे शहर आयटी राजधानी आहे. पण शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. रस्त्यावरून वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. याचा आय. टी. कंपन्यांना फटका बसत आहे.’ आतापर्यंत 120 मतदारसंघातील आढावा घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. संघटन मजबूत करण्याचा हा कार्यक्रम आहे. जनतेमध्ये जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवण्याचे काम सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांची माहिती पोहचवण्याचे काम केले जात आहे. लोकसभा निवडणु
Ramesh Chennithala : महाराष्ट्रातील सत्ताबदलाचे हादरे दिल्लीला बसणार
कीत जनतेने मविआला जसा पाठिंबा दिला तसाच विधानसभा निवडणुकीतही देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून केले जात आहेत. सरकार व पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. पोलीस आयुक्त, डीसीपी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शिपाई या सर्व पदांची पैसे घेऊन पोस्टिंग केली जात आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचेच पोस्टींग चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहराला कलंक लावणाऱ्या घटना घडत आहेत.’
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
‘राज्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पूर्व विदर्भात धान, कापसाचे पिक वाया गेले. आता मराठवाडा व विदर्भातील काही भागातील सर्व पिके नष्ट झाली आहेत. शेतकरी व नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. पण मुख्यमंत्री फक्त घोषणा करतात मदत काही पोहचत नाही. एमपीएससीच्या मुलांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सरकारने अद्याप केलेली नाही. ससून रुग्णालयासमोरची रस्ते विकास महामंडळाची सव्वादोन एकर जागा कवडीमोल भावाने दिली आहे. या जागेवर कॅन्सर हॉस्पिटल होणार होते. 500 कोटी रुपये बाजार भाव असलेली जागा ९० वर्षांच्या लिजवर ७० कोटी रुपयांना दिली आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.
‘महायुतीने मुंबई विकली’
विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘महायुती सरकारने मुंबई विकली. महाराष्ट्राची अस्मिता गुजरात दरबारी गहाण ठेवली. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला व गुजरातमधील ड्रग राज्यात आणले जात आहे. पुण्यात ड्रग्ज व गोळीबार नेहमीचेच झाले आहे. पुण्याची संस्कृती नष्ट केली आहे. टेंडर काढा व कमीशन खा एवढेच काम सरकार करत आहे. दोन दिवसापासून एस.टी. चा संप सुरु आहे. मविआ सरकार असताना एसटीच्या संपात राजकारण केले गेले. एस.टी. मंहामंडळाच्या विलिनीकरणाची मागणी केली होती.’ संप चिघळवण्यासाठी भाजपने तीन हस्तक या संपात घुसवले होते, ते आता कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला आहे.