महाराष्ट्र

Prakash Ambedkar : राहुल यांचा फोन म्हणजे लोणी लावण्याचा प्रकार

Rahul Gandhi : संपर्क साधत केली प्रकृतीची विचारपूस

Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवस शिल्लक आहेत. मतदानापूर्वी काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांना फोन केला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर काही दिवसांपूर्वी रुग्णालयात होते. आंबेडकरांच्या छातीत वेदना झाल्यानं त्यांना पुण्यातील इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या हृदयात गुठळी असल्याचं निदान झालं. त्यानंतर त्यांच्यावर अॅन्जीओग्राफी व अॅन्जीओप्लास्टी करण्यात आली. आयसीयूमध्ये असताना आंबेडकर यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला. यात ओबीसींचे आरक्षण जाणार असं त्यांनी म्हटलं होतं.

Jitu Patwari : गद्दारांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला

आंबेडकर प्रचारात परतल्यानंतर आता राहुल गांधी यांनी त्यांना फोन केला. राहुल गांधी यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तुमच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचारासाठी जात असल्याचं आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले. महायुती व महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनेक ठिकाणी निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळं राहुल यांनी आंबेडकर यांना फोन केल्याचं सांगण्यात येत आहे. ऐन निवडणुकीत राहुल गांधी यांचा प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलेला फोन लोणी लावण्याचा प्रकार असल्याचं आंबेडकर म्हणाले.

बराच वेळ संवाद

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी आपल्याला प्रकृती कशी आहे, याची विचारणा केली. आपण प्रकृती उत्तर असल्याचं त्यांना सांगितलं. सध्या काय सुरू आहे, असा प्रश्न राहुल यांनी केला. त्यावर आंबेडकर यांनी त्यांना काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात प्रचार करण्यासाठी जात असल्याचे स्पष्टपणे सांगितले. आंबेडकर यांनी शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यातील वरवट बकाल, खामगाव येथे दौरा केला. त्यानंतर अमरावतीच्या दर्यापूर, नांदगाव, अमरावती शहरालाही भेट दिली. शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीनं प्रकाश आंबेडकर यांचे काही व्हिडीओ पोस्ट केले. हे सर्व व्हिडीओ आरक्षणाशी संबंधित होते.

सत्ताधारी मताला चार हजार देतील. फक्त 80 हजार मत पाहिजे करा हिशोब. नंतर कमिशन घेऊन ते भरून काढतात. पण बेरोजगारांना अनुदान दिले जात नाही. प्रगती करायची असेल तर राज्यात बदल आवश्यक आहे. आपण ओबीसींना सांगतो. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण गेलं. आता सुप्रीम कोर्टाच्या नावाने विधानसभा झाल्या की शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण घालवतील, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत वंचित महाविकास आघाडी झाल्यामुळे काँग्रेस आणि वंचित मध्ये दुरावा वाढला होता. अकोल्यात लोकसभेला काँग्रेसने आंबेडकराविरोधात उमेदवार दिला होता. त्यामुळे लोकसभेत आंबेडकर पराभूत होत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यात राहुल गांधींच्या फोननंतर वंचित आणि काँग्रेसमधील कटुता आता काही प्रमाणात कमी होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!