महाराष्ट्र

Lok Sabha Election : मोदी चुटकीसरशी समस्या सोडवतात, तर, रोजगार व महागाई का कमी झाली नाही ?

Priyanka Gandhi : दहा वर्ष सरकार असताना तुम्ही काय केले?

Congress News : देशात आज सर्वात जास्त महागाई व बेरोजगारी आहे. केंद्र सरकारमध्ये 30 लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण मोदी सरकारने ती भरलेली नाहीत. बेरोजगारी, महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेल,गॅस सिलिंडर, खाद्यतेल, सोने, चांदी सर्वांच्या महागाईची भेट मोदींनी दिली. शेती साहित्यावर जीएसटी लावला. मोदी सरकारने जनतेला संकटात टाकले आहे.नरेंद्र मोदी जगातील शक्तीमान नेते असून चुटकीसरशी सर्व समस्या सोडवतात असा भाजपाचा दावा आहे तर रोजगार व महागाईची समस्या का सोडवली नाही ? असा घणाघाती हल्ला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला.

लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी उदगीरच्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. प्रियंका गांधी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्या म्हणाल्या, महाराष्ट्राने सामाजिक न्यायाची परंपरा जपली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही भूमी आहे. काँग्रेस सरकारने मराठवाड्यात विकासाची कामे केली आहेत.पण, मागील काही वर्षांपासून चित्र बदलले आहे. मोदी सरकारच्या काळात दलितांवर शोषण व अत्याचार होत आहेत. पण, सरकार डोळे बंद करुन बसले आहे, देशातील जनता संकटात आहे परंतु टीव्हीवर मात्र सर्वकाही आलबेल आहे असे दाखवले जात आहे.

Lok Sabha Election : तुमानेंना आमदार म्हणून विधान परिषदेत पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते

मोदी शिवाय जगात दुसरा कोणताच नेता मोठा नाही असे भासविले जाते. पण परिस्थीती तशी नाही. मोदी सरकारने तुमच्यासाठी काय केले? रोजगार दिला का? महागाई कमी केली का? तुमच्या जीवनात काय बदल घडवला ? महिलांना काही मदत केली का? असे प्रश्न विचारून प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारची पोलखोल केली. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे, नोकरी मिळावी यासाठी गरीब घरातील लोक विपरीत परिस्थीतीत मुलांचे पालन पोषण करतात. पण मोदी सरकार गरिबांना केवळ 5 किलो रेशन देते, यातून तुमच्या मुलांचे भविष्य बनणार आहे का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने गरीब श्रीमंत सर्वांना समान अधिकार दिले आहेत. हे अधिकार काढून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाला संविधान बदलायचे आहे. भाजपाचा डाव जनतेच्या लक्षात आल्यानंतर आता मोदी प्रत्येक सभेत संविधान बदलणार नाही अशी सारवा सारव करत आहेत. मोदींच्या पक्षांतील खासदारांनीच संविधान बदलण्याची भाषा केली आणि भाजपात मोदींच्या परवानगी शिवाय पानही हलत नाही, त्यांच्या परवानगीनेच संविधान बदलण्याची भाषा खासदारांनी केली पण आता त्यांची भाषा बदलली आहे.

नरेंद्र मोदी सातत्याने म्हणतात 70 वर्षात काहीच झाले नाही,10 वर्षांच्या शासन काळात तुम्ही काय केले ते तरी सांगा, असा सवाल केला. नरेंद्र मोदी हे अहंकारी नेते आहेत. ते सातत्याने खोटे बोलतात. परंतु मोदींची नौटंकी आता चालणार नाही, ‘अब की बार जनता की सरकार’, असा नारा देत आता जागे व्हा, तुमचे मत वाया घालवू नका, हा देश तुमचा आहे. आज देश वाचवण्याचा प्रयत्न केला नाही तर भविष्य अवघड आहे. मतदान करण्याआधी तुमच्या भविष्याचा विचार करा व मगच मतदान करा, असे आवाहनही प्रियंका गांधी यांनी केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!