महाराष्ट्र

P. N. Patil : तरूण ते ज्येष्ठ सर्वांसोबत होता पी. एन. पाटलांचा सलोखा !

Congress MLA : पी.एन. पाटील आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले

करवीरचे आमदार आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे आज पहाटे खासगी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आधारवड, विधिमंडळातील माझे जेष्ठ सहकारी आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे आक्रमक आणि निष्ठावान नेतृत्व आज आम्ही गमावले आहे. श्री.पी. एन. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली करतो. अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पी एन पाटील यांचे योगदान

काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचे खंदे समर्थक म्हणून आमदार पी. एन पाटील यांची ओळख होती. शिक्षण, सहकार, कृषी क्षेत्राची त्यांना उत्तम जाण होती. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. कोल्हापूर लोकसभा उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा आमदार पी. एन. पाटील यांनी झंझावाती प्रचार केला. त्यांनी काँग्रेस पक्षासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

एक निष्ठावंत आणि कर्तव्यनिष्ठ लोकसेवक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शोक भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. पी. एन. पाटील यांनी तरुण वयापासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी २२ वर्ष कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना वाढवण्याचे काम केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी पक्षवाढीत मोठे योगदान दिले होते, असे नाना पटोले म्हणाले.

Swati Maliwal : स्वाती मालिवाल यांनी निर्भयाच्या आईचा व्हिडिओ शेअर केला

पी.एन. पाटील आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने एक सच्चा काँग्रेसी व धडाडीचा लोकसेवक हरपला आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. आ. पी. एन. पाटील यांचा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क होता. मनमिळाऊ व सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता.

प्रसंगी प्रचंड आक्रमक होऊन ते लोकांचे प्रश्न सोडवत होते. गेली चार दशके कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारण आणि सहकार क्षेत्रात ते सक्रिय होते. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून तब्बल २२ वर्ष जबाबदारी सांभाळून त्यांनी पक्ष संघटना वाढवण्याचे काम केले. गोकुळ दुध संघाचे संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी शेतक-यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्याचे चेन्नीथला म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!