Congress News : प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांचे भाजप नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. नितीन गडकरी हरले तर नाना पटोले यांना दुःख होईल असे वक्तव्य त्यांनी केले होते. कोणाचे कोणाशी संबंध आहेत. ते आम्ही लवकर दाखवू. 2014 पासून आतापर्यंत कोण मतविभाजन करते. ते मी 4 तारखेला अकोल्यात जाऊन सांगेन. मला अडीच महिन्यापासून ‘टॉर्चर’ करत आहेत. माझा काय दोष आहे. ‘वंचित’ची भूमिका काय? त्यांनी सांगावे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
बागेश्वर धाम बाबा यांच्या वक्तव्यावर पटोले यांनी टीका केली. समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम बाबा करीत आहेत. महाराष्ट्रातील संतांच्या बद्दल आक्षेपार्ह विधाने करीत आहेत. या बाबांवर कारवाई करायला पाहिजे पण हे सरकार अशाच लोकांना सुरक्षा देत आहे. भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. बाबा जुमदेवजी यांना मानणारा मोठा वर्ग विदर्भात आहे. त्यामुळे बागेश्वर बाबांनी माफी मागायला पाहिजे असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.
भाजप (BJP) सरकार महाराष्ट्रात आहे, त्यामुळे हे बाबांचे वक्तव्य नसून भाजपचे वक्तव्य मानले पाहिजे. नागपूरच्या मोठ्या नेत्याचा दारूचा कारखाना आहे. परंतु बाबा जुमदेवजीनी दारूमुक्त समाज घडविला म्हणून या नेत्यांची दारु विकत नाही. बागेश्वर बाबा गुन्हेगार आहे. त्याला सोबत घेऊन पोलिस फिरत आहेत. हे दुर्दैवी आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
चर्चा संपुष्टात?
महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या एकत्रीकरणाची चर्चा आता जवळपास संपुष्टात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची यादी तयार केली आहे. त्यानंतर आता काँग्रेसनेही उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही अनेक लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत ‘वंचित’च्या समावेशाबाबतच्या चर्चा जवळपास संपल्याचे दिसत आहे. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्याविरुद्ध अनेक आरोप केले होते. आमदार नाना पटोले हे भाजपचे हस्तक असल्याचा थेट आरोप आंबेडकर यांनी केला होता. यासंदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रात (Maharashtra News) लक्ष घालावे अशी मागणीही आंबेडकर यांनी केली होती. आंबेडकरांच्या या सर्व आरोपांना नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला छळण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.