महाराष्ट्र

Nana Patole : सत्तेसाठी हे लोक काहीपण करतील 

Congress on BJP : दाऊदला सोबत घेतानाही मागेपुढे पाहणार नाही

Maharashtra Politics : अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर मंगळवारी 2 जुलैला रात्री राष्ट्रवादी पक्षाची साप्ताहिक बैठक झाली. या बैठकीला माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) उपस्थित होते. त्यामुळे नवाब मलिक यांनी महायुतीला पाठिंबा दिला का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. यावरून काँग्रेसने महायुतीवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी या मुद्द्यावरून महायुतीला घेरले आहे. 

भाजपची मानसिकता सत्तेसाठी काही पण करायचे, अशी झाली आहे. दाऊद जरी यांच्यासोबत आला, तरी सत्तेसाठी त्यांना दाऊद देखील चालेल. भाजपसाठी सुसंस्कृतपणा देशप्रेम हे महत्त्वाचे राहिलेले नाही. भाजपवाले फक्त सत्तेसाठी जगतात. संपूर्ण प्रकरण पाहिले तर भाजपबद्दल काय बोलायचे, असा प्रश्न आता पडतो. भाजपद्दल (BJP) आता बोलण्यासारखे काही शिल्लकच राहिलेले नाही, असे आमदार नाना पटोले प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

शेतकऱ्यांची लूट

पिकविमा योजनेविषयी नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सरकार फक्त घोषणाबाजी करते. कृषी विभागाची वेबसाइट अनेक दिवसांपासून बंद आहे. पीकविमा कंपन्यांना फायदा कसा होईल हे सरकार पाहात आहे. पिकविमा नोंदणीच होणार नाही तर लाभ कसा मिळणार? सरकारला कंपन्या भ्रष्टाचार करीत असल्याचे ठाऊक आहे.

Monsoon Session : दानवे यांनी व्यक्त केली दिलगिरी

तरीही दोघे मिळून शेतकऱ्यांना लुटत आहेत. सगळ्यांचे संगनमत आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली. लाडकी बहिण योजनेत राज्य सरकारची तारांबळ उडत आहे. कोणतेही नियोजन या योजनेसाठी नाही, अशी टीका त्यांनी केली.

लाडकी बहिण योजनेतून महिलांना आमिष दाखविण्याचे प्रयत्न सरकार करीत आहे. मात्र याच महिला महायुतीच्या घोषणांची पोलखोल करतील. महाराष्ट्रातील माताभगिनी निवडणुकीत महायुतीला योग्य उत्तर देतील, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. निवडणूक जवळ येत आहे. घोडा-मैदान दूर नाही. त्यामुळे जनता त्यांच्या लुटीचे प्रत्युत्तर नक्की देईल, असे पटोले यांनी नमूद केले. महिलांची लूट होत असल्याचे प्रकार अमरावती, अकोला येथे उघडकीस आले आहेत. त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांसोबत माताभगिनींची देखील फसवणूक केली आहे, असे पटोले म्हणाले.

खरा ‘स्मार्ट’पणा आणा

राज्यातील ‘स्मार्ट मीटर’ योजनेबद्दल काँग्रेसचा विरोध असल्याचेही नाना पटोले म्हणाले. केंद्रातील आणि गुजरात मधील लोकांना फायदा झाला पाहिजे, यासाठी हे मीटर बसविण्यात येत आहेत. लोकांच्या घरात अंधार करणारी ही योजना आहे. उपमुख्यमंत्र्यांनी ही योजना गुजरातमधील लोकांसाठी आणली आहे. या योजनेचा काँग्रेस विरोध करते. राज्यातील जनतेला आधी सुरळीत वीजपुरवठा द्या. शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी वीज द्या. विजेचे दर कमी करा. अशा क्षेत्रांमध्ये खरा ‘स्मार्ट’पणा दाखवा, असा टोलाही आमदार नाना पटोले यांनी लगावला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!