महाराष्ट्र

Nana Patole : अकोल्यातील तणावासाठी भाजप दोषी

Akola Riot : नाना पटोले यांचा आरोप; राजकीय फायद्यासाठी धार्मिक तेढ

अकोला शहरातील जातीय तणावाच्या घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. जातीय राजकारण शोभणारे नाही. भाजपने स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी हिंदू-मुस्लीम वाद पेटवू नये, असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. अकोल्यातील तणावाला भाजप कारणीभूत आहे, असेच त्यांनी अप्रत्यक्षरित्या म्हटले आहे. या घटनेवरून आता राजकारण सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी घटनेचा वापर होऊ शकतो.

नाना पटोले म्हणाले, ‘आत्ताच नव्हे तर अनेक वर्षांपासून हे आपण पाहत आलो आहोत. पण आता मतांच्या राजकारणासाठी हिंदू-मुस्लीम वाद पेटवू नका. माणुसकी जोपासली पाहिजे. भविष्यात अकोल्यामध्ये अश्या प्रकारच्या घटना होऊ नये, याची काळजी घेतली पाजिजे. ऐक्याचे वातावरण राहिले पाहिजे.’ अकोल्यातील जुने शहर येथील हरिहरपेठ भागात ७ ऑक्टोबरला किरकोळ कारणांवरून दोन गटांमध्ये मोठा वाद झाला होता. त्यानंतर तणाव निर्माण झाला होता.

उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा

ऑटोरिक्षाचा एका दुचाकीला धक्का लागला. या कारणावरून दोन वेगवेगळ्या समाजातील मोठ्या समुदायांत वाद झाला. वाद आणखी वाढल्याने दोन्ही बाजूने तुफान दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. यात काही जण जखमी झाले. संतप्त जमावाने ऑटोरिक्षा व दोन दुचाकींना आग लावली. घटनेनंतर पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. शहरात जातीय तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहेत. नाना पटोले यांनी भाजपसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले.

Akola Tension : दंगल घडताच पालकमंत्र्यांबाबत भाजपचा सावध पवित्रा

दोषीला माफी नाही

या प्रकारच्या राजकीय दंगलीमध्ये सर्वसामान्यांनी सहभागी होऊ नये. जातीय राजकारणात सहभागी होऊ नये. काळजी घ्यावी. अकोला शहरामध्ये हिंदू-मुस्लीम असे ऐक्याचे वातावरण रहावे. मुलगा व भाऊ म्हणून सदैव अकोलेकरांच्या सुख व दु:खात सहभागी राहील. या प्रकारच्या घटना करणारा जो कोणी असेल, त्याला माफी दिली जाणार नाही, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

संवेदनशील विषय

राजकीय उद्देश व फायद्यासाठी काही लोक जाणीवपूर्वक या प्रकारच्या घटना घडवून आणतात. निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडवून आणण्याची भाजपला सवय आहे. अकोला येथे झालेली दंगल खऱ्या अर्थाने माणुसकीला शोभा न देणारी घटना आहे. केंद्र व राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. त्यांच्या काळामध्ये या प्रकारे हिंदू, मुस्लीम वाद व दंगली होत आहेत. सर्वसामान्यांचे त्यात नुकसान होत आहे. याची दखल देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी, असे देखील नाना पटोले म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!