महाराष्ट्र

Nana Patole : मराठवाड्यातील पालकमंत्री झाले गायब 

Congress : नुकसान झालेल्यांचे पंचनामे करून मदतीची मागणी 

Flood Situation : मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते व पुल वाहून गेले आहेत. मराठवाड्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्याने पिके वाहून गेली आहेत. मात्र सरकार इव्हेंटबाजी, जाहिरातबाजी करीत आहे. सरकारने हे सगळे बाजूला ठेवावे मराठवाड्यातील लोकांना तातडीने मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे.

गेल्या दोन दिवसापासून मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, बीड,धाराशिव, लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. हजारो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. घरांची पडझडही झाली आहे. मराठवाड्याला पुराने वेढले आहे. पुरग्रस्त लोकांना मदतीची गरज आहे. पण मराठवाड्यातील सगळे पालकमंत्री गायब आहेत. नुकसानीच्या पंचनाम्याचे निर्देश द्यावे. त्याआधी तातडीची मदत जाहीर करावी, असे पटोले म्हणाले.

बचावकार्य सुरू 

पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांची सर्व व्यवस्था करावी. सर्व सरकारी यंत्रणा तातडीने कामाला लावावी. हिंगोली शहरासह अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना मदत पोहचविण्यासाठी सरकारने तातडीने आदेश द्यावे. अद्यापही पालकमंत्री जिल्ह्यांमध्ये पोहोचले नाहीत. लाडका उद्योगपती व लाडक्या कंत्राटदारासाठी सरकार जलतगतीने काम करते. त्यापेक्षा जास्त वेगाने पूरग्रस्त व शेतकऱ्यांना मदत द्यावी, असे नाना पटोले म्हणाले.

RSS Stand : जातीय जनगणनेबाबत संघाने स्पष्ट केली भूमिका

मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपूर-सूरत राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला आहे. नांदेड शहर व जिल्ह्यात पूर आहे. येथे लिंबोटी धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील 40 शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले आहेत. मराठवाडा आणि विदर्भाला जाेडणारा यवतमाळ येथील पुलही पाण्याखाली गेला आहे. नांदेड येथे आसना नदीला पूर आला आहे. त्यामुळे जवळपास 50 गावांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यामुळे परभणी-जिंतूर महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

सोलापुरात सात तासांत एक इंच पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातील 26 मंडळांत अतिवृष्टी झाली. नाशिक, धुळे, नंदुरबार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, अकोला, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे. विदर्भात महागाव तालुक्यात (जि. यवतमाळ) शनिवार रात्रीपासून ढगफुटीसदृश पावसामुळे गोंधळ उडाला. पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!