महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : काँग्रेसने फक्त आग लावण्याचे काम केले

Political War : मंत्री मुनगंटीवार यांचा हल्लाबोल; कार्यकर्त्यांना दिला विजयाचा मंत्र

BJP on Congress : काँग्रेसने संविधानाचा खोटा प्रचार केला. अनुसूचित जाती-जमातीच्या बांधवांची दिशाभूल केली. काँग्रेसने कायम आज लावण्याचेच कामे केली आहेत, या शब्दात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.बल्लारपूर शहरातील एकदंत लॉन येथे बल्लारपूर शहर आणि ग्रामीण मधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे संमेलन रविवारी (ता.११) पार पडले. यावेळी ते बोलत होते. 

‘देशातील जनतेची दिशाभूल करणे, संविधान धोक्यात असल्याचा कांगावा करणे आणि जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे राजकारण काँग्रेसने केले. लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुकीच्या प्रचाराला चोख उत्तर द्या. आणि सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे एक लक्ष्य, एक विचार पुढे ठेवून कार्य करा, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.

काँग्रेस जळते घर 

भाजप दलितविरोधी असल्याचा अपप्रचार काँग्रेसने केला. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्वत: काँग्रेसचा विरोध करायचे. ‘काँग्रेस हे जळते घर आहे. जो यात जाईल तो भस्म होईल,’ असे ते म्हणायचे. त्याच बाबासाहेबांचे नाव वापरून काँग्रेसने खोटा प्रचार केला आणि समाजाची दिशाभूल केली, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

खरे वास्तव पुढे आणण्यासाठी जनतेत जाऊन त्यांना वास्तवाची जाणीव करून देण्याची गरज आहे. आज काँग्रेस जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. अशात आपले नाव आग लावणाऱ्यांत नाही तर आग विझविणाऱ्यांत घेतले जावे, याच हेतून आणि पवित्र उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून काम करण्याचे आवाहन देखील ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना केले.

Sudhir Mungantiwar : करंट्यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; योजना बंद होणार नाही !

खुर्ची आपले ध्येय नाही

‘संगठन गढ़े चलो, सुपंथ पर बढ़े चलो, भला हो जिसमें देश का, वो काम सब किए चलो’ हे ब्रीद डोळ्यापुढे ठेवून काम करायचे आहे. खुर्ची प्राप्त करणे हे आपले ध्येय नाही. भाजपाचा कार्यकर्ता सत्तेसाठी नव्हे देशाच्या विकासासाठी काम करतो. तीच भावना कायम ठेवून येत्या काळात ‘बी फॉर भारत’, ‘बी फॉर बल्लारपूर’, ‘बी फॉर बीजेपी’ याच तत्त्वाने काम करा,’ असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.

सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, शेतकऱ्यांना मोफत वीज अशा अनेक योजनांतून महाराष्ट्रातील महायुती सरकारने राज्यातील महिला, युवा आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. देशात सर्वाधिक पीक विमा चंद्रपूर जिल्ह्यात झाल्याचे देखील त्यांनी सांगितले. सोशल मीडिया हे आजच्या युगातील मोठे अस्त्र,शस्त्र आहे. त्याचा उपयोग योग्यप्रकारे करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!