Congress News : काँग्रेसने शनिवारी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यांनी एका निवडणूक रॅलीत केलेल्या “आक्रोशपूर्ण” वक्तव्याबद्दल आणि त्यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, पक्षाने ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार पाठवली आहे आणि त्यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
काय म्हणाले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर?
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काँग्रेसच्या हातासह विदेशी शक्तींचे हातही दिसत आहेत, ज्यांना तुमच्या मुलांची संपत्ती मुस्लिमांना द्यायची आहे. राष्ट्रांची अण्वस्त्रे संपवायची आहेत.जातीवाद आणि प्रादेशिकतेवर देशाची फूट पाडायची आहे,”तुकडे तुकडे’ टोळीने काँग्रेसला पूर्णपणे ताब्यात घेतले आहे . त्याची विचारधारा आहे आणि काँग्रेसच्या ‘तुकडे तुकडे’ टोळीला पाठिंबा द्यायचा की भारताला ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ बनवणाऱ्या नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे राहायचे हे तुम्हाला ठरवायचे आहे,” असे ठाकूर म्हणाले. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथे रॅलीत ते बोलत होते. राजीव गांधी पंतप्रधान झाले, तेव्हा 55 टक्के संपत्ती सरकारकडे जाईल, असा कायदा होता. त्यांनी तो कायदा रद्द करून आपली संपत्ती वाचवली. मात्र, आता राहुल गांधींचे लग्न झालेले नाही. त्यामुळेच त्यांना तुमच्या मुलांची संपत्ती काढून घ्यायची आहे.”, असेही ते म्हणाले.
याला “अपमानजनक” टिप्पणी म्हणत, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मंत्र्यांच्या भाषणाने निवडणूक संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.अनुराग ठाकूर हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. आम्ही त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी देखील केली आहे असे काँग्रेसचे म्हणणे आहे.