महाराष्ट्र

Bunty Shelke : भाजपच्या खेम्यात घुसत शेळकेंचा प्रचार

Nagpur Congress : प्रवीण दटकेंच्या समर्थकांनी घेतली गळाभेट

Nagpur BJP : विधान परिषदेचे विद्यमान आमदार असतानाही पुन्हा आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्या भाजपचे प्रवीण दटके यांच्या खेम्यात काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी भूकंप आणला. कोविड महासाथीच्या काळात लोकांच्या मदतीसाठी अक्षरश: धावून जाणाऱ्या बंटी शेकळे यांनी भाजपच्या खेम्यात घुसत आपला प्रचार केला. विशेष म्हणजे आमदार दटके यांच्या सगळ्याच समर्थकांनी बंटी शेळके यांची गळा भेट घेत त्यांना ‘विजयी भव:’ अशा शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नीकटवर्तीय आमदारांपैकी प्रवीण दटके एक आहेत. दटके सध्या विधान परिषदेचे आमदार आहे. फडणवीस यांच्याच कृपेमुळे ते नागपूर महापालिकेच्या सभागृहातून मुंबईच्या विधान भवनात पोहोचले. अगोदरच आमदार असलेल्या दटके यांना भाजपने मध्य नागपुरातून उमेदवारी दिली. मध्य नागपूर हा संघाचा गड आहे. हा गड भेदण्यासाठी काँग्रेसचे बंटी शेळके हे 2019 पासून तयारी करीत आहेत. कोविड काळात शेळके अक्षरश: ‘ग्राऊंड लेव्हल’वर काम करताना दिसले.

संघाच्या गडात सुरूंग

बंटी शेळके 2019 पासून मध्य नागपुरातील गल्लीबोळात फिरत आहेत. पायी फिरणारा तरूण म्हणून शेळके यांनी ओळख आहे. त्या तुलनेत प्रवीण दटके हे केवळ भाजप आणि संघाच्या उपकारावर अवलंबून आहेत. कामाच्या जोरावर बंटी शेळके हे राहुल गांधी यांच्या मनात स्थान निर्माण करून आहेत. भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांचे बंटी शेळके कट्टर समर्थक आहेत. भगतसिंह तर शेळके यांचे देवच आहेत. एकीकडे दटके यांनी हायफाय प्रचार सुरू आहे, तर दुसरीकडे बंटी शेळके पूर्णवेळ पायी फिरून प्रचार करीत आहेत.

प्रवीण दटके वाहनांमधून प्रचार रॅली काढताना दिसत आहेत. बंटी शेळके घरोघरी पायी जात आहेत. प्रवीण दटके वाहनांवर बसूनच जनतेचा ‘टाटा’ करताना दिसत आहेत. बंटी शेळके प्रत्येक घरातील ज्येष्ठांना नमस्कार करताना दिसत आहे. प्रचार करताना बंटी शेळके मध्य नागपुरातील थेट भाजप कार्यालयात आलेत. आपल्या संस्कारानुसार त्यांनी कार्यालयातील मोठ्यांना नमस्कार केला आणि समवयस्कांची हात मिळविला.

हे कसे काय?

यावेळी प्रत्येकानं त्यांना आशीर्वाद दिला आणि ‘विजयी भव:’ असंही म्हटलं. त्यामुळे दटकेंचे समर्थक बंटी शेळके यांना आशीर्वाद देण्यात इतके ‘प्रवीण’ कसे झाले असा प्रश्न आता भाजपला पडला आहे. मध्य नागपुरात प्रवीण दटके आणि बंटी शेळके यांच्यात सध्या ‘कट टू कट’ फाइट सुरू आहे. या सर्व परिस्थितीत बंटी शेळके यांनी भाजपच्या खेम्यात घुसून केलेल्या प्रचारामुळं आणि दटकेंच्या समर्थकांचा आशीर्वाद मिळविल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!