Bhandara Gondia constituency : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज आपल्या सुकळी या गावी सहकुटुंब मतदान केले. प्रसार माध्यमांशी बोलताना विदर्भातील पाचही जागा काँग्रेसच्या ताब्यात येतील असा दृढ विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. दहा वर्षात मोदी सरकारने संविधानिक व्यवस्थेचा खात्मा करण्याचे जे काम केलं आहे, त्याचा जनतेमध्ये विरोध असल्याचे नाना पटोले म्हणाले.
ज्याप्रमाणे मोदी सरकारने शेतकऱ्यांना फसवलं, युवकांना फसवलं, बेरोजगारांना फ़सवलं, गरीब माणसाला फ़सवलं त्याचा बदला मतदानाच्या रूपात जनता घेणार असे नाना पटोले म्हणाले.
नाना म्हणाले,या पद्धतीचा कौल जनता देईल. शेवटी जनतेने ही निवडणूक अंगावर घेतलेली दिसते. जेव्हा जनता निवडणूक अंगावर घेते तेव्हा ते सत्ता पक्षांच्या विरोधात मतदान करते. आज ते चित्र आपल्याला पाहायला मिळत असल्याचे नाना म्हणाले. मग तुम्ही किती दिग्गज नेत्याला बोलवा,काही फरक पडणार नाही.
दुपारी 3 पर्यत्न 45.88 टक्के मतदान
दरम्यान भंडारा गोंदिया मतदारसंघात दुपारी तीन वाजे पर्यंत 45.88% मतदानाची नोंद करण्यात आली आहे. यात सर्वाधिक मतदान मोरगाव अर्जुनी तालुक्यात 53.20% इतके झाले आहे. त्यानंतर भंडारा 44.1%, गोंदिया 44.86%, साकोली 45.93%, तिरोडा 44.2%, तुमसर 44.60% असे मतदान दुपारी तीन पर्यंत झाले आहे.
Lok Sabha Election : मंडपात जाण्यापूर्वी नवरदेवाने बजावले राष्ट्रीय कर्तव्य
मतदारसंघात विविध ठिकाणी मतदानासाठी रांग लागलेली दिसली. तप्त उन्हातही उत्साहाने मतदान झाले. नव मतदारांमध्ये सकाळ पासून उत्साह होता. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त चोख होता.