महाराष्ट्र

Buldhana : राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी; काँग्रेस आक्रमक

Congress : तरविंदर सिंह मारवाच्या अटकेची मागणी

Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले. आता पुन्हा गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे. भाजपचे सरकार मात्र त्यावर काहीही कारवाई करत नाही. हे अत्यंत आक्षेपार्ह आहे, अशी आक्रमक भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

काँगेस आक्रमक 

राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. शेगाव शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करीत भाजपचा धिक्कार केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव रामविजय बुरुंगले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. यावेळी काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना धमकी देणारा भाजपचा माजी आमदार तरविंदर सिंह मारवाच्या अटकेची मागणी केली.

‘मारवा यांचे विधान भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे. भाजपला गांधी नावाची ऍलर्जी आहे. म्हणूनच मोदींपासून सर्वच नेते राहुल गांधी यांची सातत्याने बदनामी करत असतात. आतातर भाजपने सर्व मर्यादाच सोडल्या आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ काढून माथी भडवण्याचा प्रकार भाजप करीत आहे,’ असा आरोप यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला.

Reservation :  गडकरी म्हणाले, ‘इंदिरा गांधींना आरक्षण होते का?’

हिंसक राजकारणी 

राहुल गांधी यांच्या एका विधानावरून त्यांना ‘माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सारखेच मारु’, अशी धमकी दिली जात आहे. हे अतिशय निंदनीय आहे. गांधी कुटुंबाने देशासाठी बलिदान दिले आहेत. महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी देशासाठी शहीद झाले. गांधी कुटुंबाच्या जीवाला आजही धोका आहे. तरीही राहुल गांधी जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेत मिसळतात. तरविंदरसिंह मारवा हे भाजपच्या द्वेषपूर्ण आणि हिंसक राजकारणाच्या कारखान्यात तयार झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी रामविजय बुरुंगले आणि कैलासबाप्पू देशमुख यांनी केली.

आंदोलनात रामविजय बुरुंगले, माजी आमदार कृष्णराव इंगळे, शैलेंद्र पाटील, कैलास देशमुख, कविता राजवैद्य, शिवाजी धनोकार, अनिल सावळे, जयंतराव खेडकर, शेख हाशम, केशवराव हिंगणे, विजय काटोले, डी.के.शेगोकार, गोपाळ कलोरे, नासिर सैलानी, दीपक सलामपुरिया,काका सोलनकर,दयाराम, वानखडे,प्रफुल्ल ठाकरे चंद्रकांत माने, मुन्ना सोंडकर, संतोष माने आदी काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!