महाराष्ट्र

Mahayuti : भाजपच्या ‘ठरावा’ची शिंदे गटाने घेतली धास्ती?

Bhandara : लोकसभेतील पराभव भाजपच्या अंतर्गत कलहामुळे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्याची चढाओढ सुरू आहे. भंडाऱ्यात शिंदे गटासाठी हीच चढाओढ डोकेदुखी ठरत आहे. ‘केंद्रात व राज्यात शिवसेना (शिंदे गट), भाजपा व राष्ट्रवादी महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शिवसेनेच्या विरोधात कारवाया न करता युती धर्म पाळावा. ठिकठिकाणी ठराव घेत भाजपाला जागा मागण्याचा दबावाचा प्रयत्न बंद करावा. भंडारा विधानसभेची जागा शिंदे शिवसेनाच लढणार आहे. शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर हेच राहतील,’ अशी माहिती 31 ऑगस्टला शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजप कार्यकर्त्यांचा ठराव

भंडारा-गोंदिया लोकसभेत झालेला पराभाव भाजपला जिव्हारी लागला आहे. शिंदे गटाने लोकसभेत मदत न केल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे येत्या विधानसभेत भंडारा-पवनी विधानसभा मतदार संघात शिंदे गटाच्या उमेदवाराचे काम करणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. भाजप स्वतंत्र उमेदवार उभा करेल असा ठराव एकजुटीने घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या पराभवाला अंतर्गत कलह कारणीभूत आहे. यासाठी शिवसेनेवर पराभवाचे खापर फोडणे चुकीचे आहे, अशी भूमिका शिंदे गटाने मांडली आहे.

पुरावे सादर करा

‘भाजपचे लोक विद्यमान विकास पुरुषाच्याविरोधात जागा मागत आहेत. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासाठी निवडणुकीत काम करणार नाही, असे ठराव घेत आहेत. आम्ही स्वतंत्र उमेदवार उभा करू, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपासाठी काम केले नाही, असे सांगत आहेत. आम्ही काम केले नाही, याचे पुरावे भाजपने सादर करावे, असे खुले आव्हान शिवसेनेने भाजपाला पत्रपरिषदेतून दिले गेले आहे.

शिंदे गटाची स्वबळाची भाषा

भंडारा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. भंडाराची जागा शिवसेनेची असल्याने आमदार नरेंद्र भोंडेकर यांची उमेदवारी निश्चित आहे. शिवसेनेने भंडारा विधानसभेत केलेला विकास भाजपच्या पचलेला नाही. भाजपचा जास्तच आग्रह असेल तर त्यांनी स्वतः जागा लढवावी. आम्ही जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी सामोरे जाऊ, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे. पत्रपरिषदेला शिवसेना (शिंदे गटाचे) उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, उपजिल्हा प्रमुख विजय काटेखाये, पवनी तालुका प्रमुख प्रशांत भुते, भंडारा-गोंदिया युवा सेना प्रमुख जॅकी रावलानी, भंडारा शहर प्रमुख मनोज साकुरे, पवनी शहर प्रमुख देवराज बावणकर आदि उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!