महाराष्ट्र

BJP on Congress : विजय वड्डेटीवार यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election : मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याकडून टीका 

Congress News : विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केलेल्या विधानाची तक्रार करण्यात आली आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांच्या विरोधात त्यांनी व्यक्तव्य केले. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी त्याचा निषेध केला. याबाबत मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनीविजय वड्डेटीवार आणि काँग्रेसवर कारवाईची मागणी केली आहे.

अजमल कसाब किंवा आतंकवाद हा पाकिस्तानमधून पसरवलेला नाही. मुंबई हल्ल्यात पाकिस्तान नाही. कसाबने निष्पाप लोकांचे बळी घेतले नाहीत. कसाबने आमच्या वीर पोलिस अधिकाऱ्यांना मारलेले नाही. शहीद केलेले नाही. या पद्धतीची जी पाकिस्तानची भूमिका आहे तीच काँग्रेसची भूमिका का आहे? जी भाषा पाकिस्तान करत आहे. तीच भाषा काँग्रेस का करतेय? असा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला.

व्यक्त केला संताप 

मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील निवडणूक कार्यालयात शेलार यांनी यावर भाष्य केले. आमदार ॲड. आशिष शेलार यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ॲड. उज्वल निकम उपस्थित होते. माझ्याकडे बरीच माहिती आहे. माझ्या पोतडीत बरेच काही आहे. पण देशहित माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी, काही बोलत नाही, असा गर्भित इशारा ॲड. उज्ज्वल निकम यांनी काँग्रेसला दिला. विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केलेले आरोप बिनबुडाचे निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. वड्डेटीवार पाकिस्तानला जे हवे तेच का बोलत आहेत, असा सवालही ॲड. निकम यांनी केला.

आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले की, विरोधी पक्षनेते वड्डेटीवार यांनी संशय निर्माण करणारी विधान केली.जी न्यायालयीन निवाड्याच्या विरोधातली आहेत. हे सत्य घटनेवर आधारित नाही. ती खोटी आणि असत्य आहेत. म्हणून केवळ मतांच्या लांगुलचालनासाठी या पद्धतीचे विधान केले गेले आहे.

हे विधान बदनामी करणारे आहे. भावना भडकवण्याचा आहे. या निवडणुकीमध्ये असत्य पसरवण्याचा प्रयत्न करणारे आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षावर आणि वड्डेटीवार यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी. अशा पद्धतीची तक्रार आम्ही मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे असे आमदार ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

Lok Sabha Election : विजय वडेट्टीवार यांचा निवडणूक प्रचाराचा अधिकार काढून घ्यावा

काँग्रेस पक्षाला आम्ही काही थेट प्रश्न विचारू इच्छितो की, कसाब हा आतंकवादी होता. कसाबने गोळ्या झाडल्या. न्यायालयाने त्याच्यावर निवाडा दिला. आरोपीला शिक्षा झाली. मग जी भाषा पाकिस्तान करत आहे तीच भाषा काँग्रेस का करतेय? आशिष शेलार म्हणाले की, या विषयावर उद्धव ठाकरे आणि शिवसेना उबाठा यांनी भूमिका स्पष्ट करावी. कसाबला झालेली शिक्षा योग्य की अयोग्य. कसाबने आपल्यावर आतंकवादी हल्ला केला नाही का. कसाबच्या मागे पाकिस्तानी नाही का. जो निवाडा न्यायालयाने दिला, यावर ठाकरे यांचे काँग्रेसला समर्थन आहे की नाही ? याचाही खुलासा करावा. वड्डेटीवार आणि काँग्रेस जे बोलत आहे ते ठाकरे गटाला मान्य आहे का? असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे यांना आ. ॲड. शेलार यांनी यावेळी केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!