महाराष्ट्र

Akola Tension : ऑटो, दुचाकीच्या धक्क्याच्या क्षुल्लक कारणावरून दंगल

Police Action : मोठ्या प्रमाणावर दगडफेक; पोलिसांची दमछाक

Force Deployed : ऑटो आणि दुचाकीच्या धक्क्यावरून सोमवारी (ता. 7) अकोल्यात भीषण दंगल उसळली. संतप्त जमावाने ऑटो आणि दुचाकीची जाळपोळ केली. त्यानंतर तुफान दगडफेक करण्यात आली. जुने शहरातील किल्ला चौक ते पोळा चौक मार्गावर ही घटना घडली. वादानंतर काही वेळातच दोन्ही बाजुने हिंसक जमाव रस्त्यावर आला. दोन्ही कडच्या जमावाने एकमेकांवर तुफान दगडफेक केली. यात काही जण गंभीर जखमी झालेत. माहिती मिळताच पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, शहर उपअधीक्षक सतीश कुळकर्णी ताफ्यासह जुने शहरात दाखल झाले. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बळाचा वापर करीत जमाव पांगविला. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तणावाच्या घटना घडत आहे. बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यातही तणाव वाढला आहे. अशातच अनंत चतुर्दशीच्या दिवशीही अकोल्यात तणाव वाढला होता. अकोट येथे मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यापूर्वीपासूनच अकोल्यात तणावाच्या घटनांमध्ये 2023 पासून वाढ होतच आहे. अशात सोमवारी सायंकाळी पुन्हा एकदा हिंसेचा भडका उडाला.

दगडांचा खच

जुने शहरातील ज्या भागात दंगल उसळली तेथे सर्वत्र दगडांचा खच पडला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही तुफान दगडफेक करण्यात आली. हमजा प्लॉट आणि चांदखाँ प्लॉट परिसरात शिरताना पोलिसांना संतप्त जमावाचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागला. यापूर्वीही ईदच्या पूर्वसंध्येला हरीहरपेठ भागातच तणाव निर्माण झाला होता. जुने शहर भागातील राजेश्वर मंदिरासमोर पोलिस स्टेशन आहे. हा भाग अत्यंत संवेदशनशिल आहे. अकोल्यातील आतापर्यंतच्या सर्व दंगली याच भागातून सुरू झाल्या आहेत. देवेन भारती पोलिस अधीक्षक असताना 2003 मध्ये या भागात सर्वांत मोठी दंगल उसळली होती. 1992-93 नंतरची ही मोठी दंगली होती. त्यानंतर पोलिसांनी काही बदल केले.

Yavatmal Police : याचिकाकर्ते पोलिस सुरक्षेत भाजी घ्यायला जातात

जुने शहरातील भांडपुरा येथे कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारण्यात आली. या चौकीमध्ये 24 तास पोलिस ताफा बसतो. दंगल नियंत्रण पथक कायम तैनात असते. दर तासाला अकोल्याचा पोलिस नियंत्रण कक्ष या चौकीतून वायरलेसवरून परिस्थितीची माहिती घेत असतो. या चौकीपासून जुने शहर पोलिस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. त्यानंतर काही गल्ल्या सोडूनच डाबकी रोड पोलिस स्टेशन आहे. या दोन्ही पोलिस स्टेशनच्या मधोमध असलेल्या जय हिंद चौकातही पोलिस चौकी आहे. भांडपुऱ्यातील पोलिस चौकीप्रमाणे येथेही कायम पोलिस ताफा असतो. परंतु त्यानंतरही सर्वाधिक तणाव याच भागात निर्माण होतो.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!