महाराष्ट्र

Puja Khedkar : पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून खटला

IAS Suhas Diwase : पूजा खेडकरने केली होती पोलिसात तक्रार

Legal Action : बनवाबनवी करणारी बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुजाविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे. पूजा खेडकरने पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला लैंगिक छळ केला असल्याचा आरोप केला होता. वाशिम (Washim) पोलिसात पुजाने तक्रारही दाखल केली होती. सुहास दिवसे यांनीही पुजाची तक्रार केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी वारंवार समन्स बोलावून देखील पूजा गायब आहे. अशात आता दिवसे यांनी पुजावर अब्रु नुकसानीचा दावा केला आहे.  

नाव, पत्त्यात बदल करून पुजाचे युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र जोडले. क्रिमिलेअर प्रमाणपत्रही बोगस निघाले. त्यामुळे युपीएससीने पुजाला बडतर्फ केले आहे. तिला यापुढे कोणतीही स्पर्धा परीक्षा देता येणार नाही, अशा स्वरूपाने युपीएससीने काळ्या यादीत टाकले आहे. पुजासंदर्भात आता फौजदारी कारवाई सुरू आहे. त्यामुळे तीने दिल्ली उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली आहे. पुजा सध्या गायब आहे. पुजाने युपीएससीच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाला तिने आव्हान दिले आहे. अनेकांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. डीओपीटी, युपीएससी, लबसाना, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पुण्याचे जिल्हाधिकारी यांनाही याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.

पुजाचा शोध सुरू

युपीएससीने उमदेवारी रद्द केल्यानंतर पुजाविरुद्ध फौजदारी कारवाईला सुरुवात झाली आहे. अशात पुजाने अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी अर्ज केला होता. दिल्लीच्या न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्र सरकार, मसुरीस्थित आयएएस ट्रेनिंग ॲकॅडमी आणि दिल्ली एम्सकडून फसवणूक आणि बनावटगिरीच्या प्रकरणात पूजा खेडकरबद्दल माहिती मागवली आहे. अशातच आता पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुजाविरुद्ध मानहानीचा दावा केला आहे. पुजाचे वडिल दीपक हे सनदी अधिकारी होते. पुजाच्या आई-वडिलांविरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्या संपत्तीची चौकशी होणार आहे. पुणे प्रशासनाने खेडकर यांच्या घरावर हातोडाही चालविला आहे.

Pooja Khedkar. : ‘सरकारने मला बोलण्याची परवानगी दिलेली नाही’

पुजाने आपल्या खासगी आलीशान ऑडी कारवर अनधिकृतपणे अंबर दिवा लावला होता. त्यावर महाराष्ट्र शासन असे लिहिले होते. ही ऑडी कार एका खासगी अभियांत्रिकी कंपनीच्या मालकीची आहे. या कारविरुद्ध मोठ्या प्रमाणावर वाहतूक नियम मोडल्याची नोंद होती. पुजाचे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी कार जप्त करण्याची हालचाल सुरू केली होती. त्यानंतर पुजाने कारवरील दंडाची संपूर्ण रक्कम भरली. चालकाने कार पोलिसांच्या स्वाधीन केली. महाराष्ट्र सरकारने पुजाला वाशिममधून कार्यमुक्त केले. त्यानंतर पुजाला आयएएस प्रशिक्षण अकादमी येथे जाण्यास सांगण्यात आले. परंतु ती तिथेही गेली नाही. त्यानंतर युपीएससीने तिची उमेदवारी रद्द करीत तिला काळ्या यादीत टाकले आहे. आता दिवसे यांनीही पुजाविरुद्ध आणखी एक कायदेशीर कारवाईचे हत्यार उपसले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!