महाराष्ट्र

Eknath Shinde : लाडकी बहिण कायमस्वरुपी राहणार 

Promise By CM : विरोधी पक्षातील सावत्र भावांचे योजनेविरोधात प्रयत्न

Maharashtra Government : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यासाठी वर्षापासून नियोजन करण्यात आले आहे. राज्यात लेक लाडकी योजना सुरू केली तेव्हा निवडणूक नव्हती, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांना सुनावले. माझी लाडकी बहिण योजना निवडणुकीपुरती नाही. विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी ही योजना कायमस्वरुपी सुरू राहणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये आयोजित महिला सशक्तीकरण अभियान मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रसार-प्रचार कार्यक्रमाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये आयोजन केले होते. 

महिला मेळाव्याला महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती नोंदविली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लाडकी बहिण योजनेत महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये तर वर्षाला 18 हजार रुपये मिळणार आहेत. एका घरात दोन बहिणी असतील तर त्या घरात वर्षाला 36 हजार रुपये मिळतील. महायुती सरकारने (Mahayuti) महिलांसाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. या योजनांमधून राज्यातील दोन कोटी महिलांना लाभ मिळाला आहे. लाडकी बहिण योजना सावत्र भावांच्या डोळ्यात खुपत आहे.

कोर्टात लढ्याची तयारी

लाडकी बहीण योजनेच्या विरोधात कोर्टात जायचे आणि स्टे घ्यायचा असा प्रयत्न विरोधकांनी केला आहे. मात्र लाडक्या बहिणींला कोर्ट न्याय देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कपटी आणि सावत्र भावांपासून लाडक्या बहिणींनी सावध राहावे. या योजनेत सर्व जातीधर्माच्या महिलांना लाभ मिळणार आहेत. अर्थसंकल्पात सरकारने या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महायुती सरकारचा इरादा नेक, सुरक्षित ठेवणार बहिण आणि माझी लेक असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महिलांना सक्षम केल्याशिवाय देश महासत्ता होऊ शकत नाही. महिला शक्तीला आपण दुर्गा म्हणतात. त्यामुळे मातृशक्तीची केवळ फोटोमध्ये पूजा करुन चालणार नाही, असे आवाहन शिंदे यांनी केले.

Sudhir Mungantiwar : ठरलं ! महाराष्ट्राला मिळणार नवे सांस्कृतिक धोरण

महिलांचे हात बळकट केले पाहिजे. दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नाकाम सरकार उलथवून टाकले. जनता सुज्ञ आहे. घरी बसणाऱ्यांना नाही तर लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्यांना निवडून देते. महाविकास आघाडी व्देषाचे आणि सुडाचे राजकारण करत आहेत. महायुती सरकार सुखाचे आणि समृद्धीचा मंत्र घेऊन काम करत आहे. मराठवाडा म्हणजे दुष्काळवाडा अशी ओळख पुसून टाकायची आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. नदीजोड प्रकल्प, मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पांतून ते शक्य होणार आहे. यासाठी केंद्र सरकार पाठिशी उभे आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विरोधक रांगेत 

आपल्यावर घटनाबाह्य मुख्यमंत्री अशी टीका होत होती. आता तेच लोक त्यांच्याच कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे बोर्ड लावत आहेत. महिलांचे फॉर्म भरुन घेत आहेत. अशा लोकांपासून महिलांनी सावध राहावे. सरकारने जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू कार्यालय आणि ऑनलाइन अर्ज स्वीकृती केली जात आहे, अशाच ठिकाणी महिलांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!