महाराष्ट्र

Lok Sabha Election : राहुल गांधीची अवस्था येडं पेरलं आणि खुळ उगवलं

Kolhapur Constituency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घणाघाती टीका

Shiv Sena : काँग्रेस काय चाललंय तर येड्यांची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस, पडू दे त्यांचा पाऊस. मोदींकडे नुसते आश्वासनांचे पेढे नाहीत तर त्यांच्याकडे गॅरंटी आहे. ‘येड पेरलं आणि खुळं उगवलं’ अशी राहुल गांधींची अवस्था झाल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवत उद्धव ठाकरे परिवार पंजाला मतदान करणार. हे या राज्याचे दुर्दैव आहे. ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा ते जाहीरपणे सांगण्याचा त्यांना अभिमान वाटतोय. आता त्यांना हिंदू म्हणण्याची लाज वाटते. हिंदुहृदयसम्राट म्हणण्यास त्यांची जीभ कचरू लागली आहे. उद्धव ठाकरे 100 टक्के काँग्रेस झाली आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

कोल्हापुरातील तपोवन मैदानात आयोजित महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. उद्धव ठाकरे परिवार काँगेसला मतदान करणार हे पाहून बाळासाहेबांच्या मनाला यातना, वेदना होत असतील. महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांचा विजय निश्चित आहे. निवडणुकीनंतर धनुष्यबाण येईल. कोल्हापुरातून पंजा कायमचा हद्दपार होईल. कोल्हापूरकर यावेळी धनुष्यबाणाचा खटका ओढून विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Lok Sabha Election : मोदी चुटकीसरशी समस्या सोडवतात, तर, रोजगार व महागाई का कमी झाली नाही ?

मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरातील पुराची कटु प्रसंगाची आठवण सांगितली. ते म्हणाले की पुरात एक गर्भवती महिला अडकली होती. त्यावेळी आपण कार्यकर्त्यांसह स्वतः घटनास्थळी जाऊन गर्भवती महिलेची सुटका केली. तिला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलो. कोल्हापुरातील या अस्मानी संकटात सतत 12 दिवस लोकांना मदत करत होतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मोदी निःस्वार्थ व्यक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म राष्ट्रनितीसाठी झाला आहे. आईचे दु:ख विसरुन निःस्वार्थ सेवा करणारा पंतप्रधान देशाला हवा आहे. आईच्या पदराला धरुन राजकारण करणारा पंतप्रधान नको आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली. महाराष्ट्रातील जनता मोदींसोबत आहे. या देशात मोदीजींची गॅरंटी चालते. महाराष्ट्रात हर घर मोदी आणि मना मनात मोदी आहेत, असे ते म्हणाले. मोदी गॅरंटीच्या आड येणाऱ्यांचा काटा किर्र झाल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!