Shiv Sena : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे सुपुत्र इतक्या खालच्या स्तराला जाईल असे कधीही आणि कोणालाही वाटले नव्हते. भगवा आमचा स्वाभिमान, त्यांना शिवरायांचा भगवा झेंडा, प्रभू रामचंद्राचा भगवा आणि वारकऱ्यांच्या भगव्या झेंड्याची अॅलर्जी झाली आहे.त्यांचा संबंध फक्त हिरव्याशीच आहे.अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
विकास कामावर हल्लाबोल..
दोन वर्षांत राज्याचा सर्वांगीण विकास झाला. सर्व घटकांना सोबत घेऊन आम्ही काम करतो आहे. पण आपले सरकार येण्यापूर्वी सगळी कामे बंद होती.50 कोटी रुपये ठाकरे गटाने स्वत:कडे ठेवून घेतले. मेट्रो कारशेड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबईचे सौंदर्यीकरण असे अनेक प्रकल्प महायुतीने सुरू केले. दोन अडीच वर्षात मुंबईतील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. रस्त्यावर केवळ डांबर टाकायचे आणि त्यात पैसे खायचे. यासाठी महापालिकेचे दहा वर्षात साडेतीन हजार कोटी रुपये खर्च झाले होते. पुढील 25-30 वर्षात रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबईचे प्रकल्प थांबले, विकास रखडला
मुंबईची विकास कामे अहंकारामुळे रखडली. आता विकासाचे विमान भरारी घेत आहे कारण गतिमान सरकारच्या हाती काम आहे. मुंबईसाठी इतके वर्ष काय केले, याचा हिशेब मुंबईकर येत्या निवडणुकीत विचारल्या शिवाय राहणार नाही. पोलिसांच्या निवासस्थानांच्या पुनर्विकासाचा गेले अनेक वर्षे रेंगाळलेला प्रश्न अखेर मार्गी निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हाडा अभिन्यासातील पोलिस वसाहतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत सुरू करण्यात येणार आहे.पुनर्विकास रखडलेल्या 388 इमारतींसाठी नगर विकास विभागाला वेगळा नियम करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.
Illegal Moneylenders : तीन अवैध सावकारांच्या व्यवहाराला लावला ‘ब्रेक’
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानांच्या रूपात..
मोदी हे जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यांनी देशाला वेगवान विकासाच्या मार्गावर भरधाव पुढे नेले आहे. नरेंद्र मोदी हे विकासपुरुष आहेत . रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटीतील आरोपी इक्बाल मुसा फिरतो. याकूब मेनन यांच्या कबरीचे उदात्तीकरण होतेय. मुंबई हल्ल्यातील शहिद पोलीसांचा अपमान केला, अशा ढोंगी लोकांना निवडणुकीत जागा दाखवा. एकीचे बळ दाखवून त्यामुळे नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी मुंबईतील लोकसभेच्या सर्व सहा जागांवर महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.