महाराष्ट्र

Navargaon Village : मद्यधुंद ग्रामसेवकाला आधी चोप नंतर..

Police Intervention : खाकी दिसताच समजुतीतून मिटला वाद

एकीकडे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा संप सुरू होता. त्यातच राखी पौर्णिमेचा सण सर्वत्र साजरा करण्यात येत होता. मात्र गोंदिया जिल्हाच्या नवरगावकला येथील ग्रामसेवकामध्ये विकृती जागी झाली. त्याने एका महिलेच्या घरी जावून छेड काढली. पीडित महिलेने आरडाओरड करताच नागरिकांच्या जमावाने त्या ग्रामसेवकाला चांगलाच चोप दिला. नागरिकांनी संपात व्यक्त केला. ही घटना 19 ऑगस्टला रात्री 8 वाजता सुमारासची घडली.

घटनेनंतर काही गावातील प्रतिष्ठीतांनी मध्यस्थी करून निर्माण झालेला गैरसमज दूर केला आणि समजुतीतून वाद मिटविला. असे असले तरी त्या प्रामसेवकाला चोप देताना टिपलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. तालुक्यातील नवरगावकला या गावात ग्रामपंचायत कार्यालयात चौधरी नावाचे ग्रामसेवक कार्यरत आहेत. सद्या जिल्ह्यात ग्रामपंचायत पदाधिकारी संपावर गेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतचे कामकाज ठप्प पडले आहे.

त्यातच 19 ऑगस्टला ग्रामसेवक अचानक नवरगाव येथील एका महिलेचा घरी पोहचला. दरम्यान रात्री संधी साधून तिची छेड काढली. या महिलेने आरडाओरड करताच तिचे कुटुंब धावून आले. महिलेने सांगितलेल्या आपबितीवरून गावातील नागरिकांनी त्या ग्रामसेवकाला चोपले.

BJP : गटबाजी शिगेला; फडणवीसांना गेले पत्र

चौकात आणून नागरिकांनी त्याला चांगलेच बदडले. यामुळे रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत नवरगावकला या गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान ग्राम पंचायतच्या काही पदाधिकाऱ्यांसह प्रतिष्ठीत नागरिकांनी गावातील युवक व नागरिकांची समजूत घातली. पीडित महिलेचा झालेला गैरसमज लक्षात आणून दिल्यानंतर त्या ग्रामसेवकाला सोडण्यात आले.

समजुत घालून दोन्ही पक्षांतील वाद मिटविण्यात आला. या संदर्भात कुठेही तक्रार करण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे नवरगावकला येथे ग्रामसेवकांच्या विरुद्ध निर्माण झालेला राडा जवळपास 2 तास चालला. या राड्याची गावाकऱ्यांकडून चित्रफिती तयार करण्यात आली. आज दिवसभर या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला. यामुळे नवरगावकला येथील घटनेची गोंदिया तालुक्यात चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे दारूचे व्यसन एखाद्या व्यक्तीला कशाप्रकारे वाईट कृत्य करायला भाग पडते याची चर्चा सुरू झाली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!